गोष्ट माझ्या आईची भाग ३०
*📝गोष्ट माझ्या आईची*
*📝 राकेश शर्मा भारतीय अंतराळवीर .*
📔 *भाग - 30*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*माझी आई मला सांगायची या जगात परमेश्वर ही एक महान शक्ती आहे.त्याची प्रार्थना करावी,त्यात मोठे सामर्थ्य असते.जेव्हा काही गोष्टी आपण बुद्धीच्या जोरावर करताना निराश होतो तेव्हा हिच श्रद्धा तुम्हाला निश्चित यशापर्यंत घेऊन जाते.माझे स्वप्न होते की मी एन. डी. ए मध्ये प्रवेश घ्यावा त्या दृष्टीने मी पर्यंत केले आणि मी यशस्वी झालो.भारतीय हवाई दलात जेव्हा मी दाखल झालो तो माझ्या जीवनातील आनंदी दिवस होता.या यशात आईचे संस्कार होते*.
*लहानपणी जी विमाने डोळे विस्पारून मी पहात असे ती विमाने मी सहज चालवू लागलो होतो."आयुष्यात जे करिअर म्हणून निवडशील ते पोटासाठी निवडू नकोस तर त्यात सर्वोच्च स्थान मिळवण्याचा प्रयत्न कर" हे साधे सोपे जीवनाचे गणित ती सांगत असे.माझी रशियन यानातून चंद्रावर जाणारा पहिला अंतराळवीर म्हणून निवड झाली.या यानामध्ये गुरुत्वाकर्षण विरहित स्थितीत राहावे लागते.त्यासाठी मन आणि शरीर विशिष्ट रीतीने घडवावे लागते.ते मी योगसाधना करून घडवले*.
*"आपली संस्कृती,संस्कार हे सर्वोत्तम आहे,भारतीय प्रथा,परंपरा महान आहे त्याचा अभिमान बाळगावा.कोणतेही काम करताना खूप मेहनत करावी.परमेश्वर आपल्याला रोज साथ देणार नसेल तरी कसोटीच्या वेळी तो नक्की आपल्या पाठीशी असतो."त्याकाळी तिचे हे संस्कार माझ्या समजण्यापलीकडे होते,पण जीवनात त्याचा प्रत्यय मला अनेक वेळा आला*.
*त्याकाळी जी अवकाश याने तयार होत असे ती एकदाच वापरता येत असे.चंद्रावरून यान वातावरणात शिरले की पेट घेणार होते.त्या पेटलेल्या अवस्थेत आम्हाला यानातून जम्पिंग करायचे होते.तो क्षण जीवन मरणाचा होता पण त्यावेळी आईचे शब्द आठवले"कसोटीच्या क्षणी परमेश्वर तुमच्या पाठीशी असतो*".
*आई पहाटे पासून अंगणात बसलेल्या चिमण्यांसाठी पहाट होत असते.मुलांच्या संस्काराची वाट होत असते.आईची पावले घरभर उमटत असतात,पण ती दिवसभर सर्वांसाठी किती चालली हे नाहीच मोजता येत कुणाला ती कितीही थकली तरी*.
Comments
Post a Comment