स्काॅलरशिप - समूहदर्शक शब्द
*एका पेक्षा जास्त वस्तू , घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्यांना समूहदर्शक शब्द म्हणले जाते*. 1) समूह : शब्द 2) आंब्याच्या झाडांची : आमराई 3)उतारुंची : झुंबड 4) उपकरणांचा : संच 5) उंटांचा/ लमानांचा : तांडा 6)केसांचा : पुंजका, झुबका 7) करवंदाची : जाळी 8) केळ्यांचा : घड, लोंगर 9)काजूंची : गाथण 10)किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा 11)खेळाडूंचा : संघ 12)माशांची : गाथण 13)गाईगुरांचे : खिल्लार 14)गुरांचा : कळप 15)गवताचा : भारा 16)गवताची : पेंडी, गंजी 17)चोरांची, दरोडेखोरांची : टोळी 18)जहाजांचा : काफीला 19)ताऱ्यांचा : पुंजका 20)तारकांचा : पुंज 21)द्राक्षांचा : घड, घोस 22)दुर्वाची : जुडी 23)धान्याची : रास 24)नोटांचे : पुडके 25)नाण्यांची : चळत 26)नारळाचा : ढीग 27) नारळांची - पेंड 28)पक्ष्यांचा : थवा 29)प्रश्नपत्रिकांचा, पुस्तकांचा : संच 30)पालेभाजीची : जुडी, गड्डी 31)वह्यांचा : गठ्ठा 32)पोत्यांची, नोटांची : थप्पी 33)पिकत घातलेल्या आंब्याची : अढी 34)फळांचा : घोस 35)फुलझाडांचा : ताटवा 36)फुलांचा : गुच्छ 37)बांबूचे : बेट 38)भाकरीची : चवड 39)मडक्यां...