गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३७
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -37-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्याचे बालपण अत्यंत साधारण परिस्थितीत गेले त्याने शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप संघर्ष केला.परंतु शिक्षणाबद्दल असलेल्या समर्पणाने त्याने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली.त्याने आयआयटी मुंबईतून पुढे एमटेक केले आणि नंतर बेल्जियम मधील आय एम इ सी विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केले. पुढे तो मुलगा आयआयटी मुंबईमध्ये ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा प्राध्यापक होतो.सौर ऊर्जा क्षेत्रात मोठे योगदान देतो. लाखो रुपयाची नोकरी हाताशी असताना त्याच्या असे लक्षात येते की इंधनाचे पारंपारिक साठे नष्ट होत चालले आहेत शिवाय यामुळे येणारी प्रदूषणाची समस्या ही बिकट होणार आहे. या विचारातून तो मुलगा ग्रामीण भागातील मुलांना या बाबत शिक्षण आणि सौरऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांवर काम करण्याचा संकल्प करतो.त्याच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये लाखो ग्रामीण घरांना आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ प्रकाश मिळतो.पुढे हाच मुलगा ऊर्जेच्या अपारंपारिक स्रोतांचे महत्त्व लोकप्रिय करण्यासाठी सौरऊर्जेवर चालणाऱ्या बसमधून संपूर्ण देशभर फिरण्याचे ठरवतो.मग तो मुलगा ऊर्जा स्वराज्य आणि सौर तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी इतके मोठे कार्य करतो की त्याला भारताचा सोलर गांधी म्हणून ओळखले जाते. तो मुलगा म्हणजे सोलर मॅन ऑफ इंडिया डॉक्टर.चेतन सोलंकी*.
*त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले यात पंतप्रधान नवउन्मेष पुरस्कार आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चा समावेश आहे. ऊर्जेच्या अपारंपारिक साधनांचे महत्त्व लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ऊर्जा स्वराज्य यात्रा या उपक्रमाची सुरुवात 2020 मध्ये केली.या यात्रेत त्यांनी सौरऊर्जेवर चालणाऱ्या बस मध्ये वास्तव्य केले आहे. संपूर्ण भारतभर ते प्रवास करतआहे.या मागचा उद्देश सौर ऊर्जा वापरण्याचे महत्त्व पटवून देणे व कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे.सौर उर्जेवर चालणाऱ्या बसमधून संपूर्ण देशभर ते फिरत आहेत.सौर ऊर्जा जागृती साठी शाळा महाविद्यालय आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये ते जनजागृती करत आहेत.त्यांचा उद्देश जलवायू बदलाचे धोके लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ऊर्जा वाचवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.त्यांची कार्यप्रणाली भारताला सौरऊर्जा प्रकल्प निर्माण बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे मानली जात आहे.प्रदूषणापासून जग वाचवायचे असेल तर सौरऊर्जेच्या वापरावर अधिक काम केले पाहिजे यावर ते ठाम आहेत*.
*त्यांनी स्थिरतेसाठी स्थानिकीकरण या प्रकल्पाद्वारे 10,000 पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे.आणि सात दशलक्षपेक्षा अधिक कुटुंबांना सौर ऊर्जेचा स्वच्छ प्रकाश दिला आहे.त्यांनी समाजातील ऊर्जा समस्यावर लक्ष केंद्रित केले आणि सौर ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने कार्य केले आहे.ते नेहमी म्हणतात पैसा साधन आहे साध्य नाही.म्हणूनच लाखो रुपयांच्या पगारापेक्षा त्यांनी समाज कल्याणाला प्राधान्य दिले.चेतन सोलंकी यांनी सौर ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणादायी काम केले आहे.त्यांच्या जीवनातून आपण शाश्वत विकास आणि साधेपणाचे मूल्य अंगीकारू शकतो.सौर उर्जेवर इतके मोठे कार्य करणार्या चेतन सोलंकी यांचे जीवन आपल्याला हेच सांगतो की,तुम्ही एखाद्या समस्यावर लक्ष केंद्रित करा. त्या समस्यांच्या मुळाशी जा.त्याची सोडवणूक करण्यासाठी आयुष्याचे सगळे कसं पणाला लावा.ती समस्या सोडवताना अधिकचे परिश्रम आणि प्रचंड मेहनत करा.त्यानंतर मिळणारे यश हे तुमच्या आनंदाचा सर्वोच्च बिंदू असेल*.

Comments
Post a Comment