गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३८
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -138-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
त्याचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 मध्ये तिरुचिरापल्ली तामिळनाडू येथे झाला.त्याच्या आईचे नाव पार्वती,तर वडील चंद्रशेखर अय्यर हे प्राध्यापक होते. त्याने 11 आणि 13 वर्षामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बहुतेक शास्त्रात विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला.पदवीधर विद्यार्थी असताना 1906 साली त्याचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित झाला वयाच्या 19 व्या वर्षी इंडियन फायनान्स सर्विस मध्ये असिस्टंट अकाउंट जनरल म्हणून तो नोकरीला लागला.येथे त्याची सर्वप्रथम आयएसएस म्हणजेच इंडियन असोसिएशन फॉर द अप्लाइन्सन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेची ओळख झाली.मग मात्र तो मुलगा थांबला नाही तेथे त्याने स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळवली.येथील संशोधनातूनच प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून जात असताना त्याच्या तरंग लांबी किंवा रंगात बदल होतो हा शोध त्याने लावला.समुद्राच्या पाण्याचा निळा रंग दिसतो कारण हा रंग पाण्याच्या प्रकाश प्रकीर्णनामुळे दिसतो हे त्याने सिद्ध केले. हा आगळा वेगळा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन म्हणजेच महान शास्त्रज्ञ सी व्ही रामन.
सी व्ही रामन यांनी केलेल्या संशोधनातील महान कार्याबद्दल त्यांना 1929 मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले.1930 मध्ये त्यांना अत्यंत मानाचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.हे पारितोषिक मिळवणारे ते भौतिकशास्त्रातील पहिले प्राध्यापक होते.पुढे लेनिन शांतता पुरस्कार, फ्रँकलिन पदक, भारतरत्न पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.सी व्ही रामन यांच्या नावाने दरवर्षी सी व्ही रामन पुरस्कार दिला जातो.
प्रकाशाच्या रंगांवरील संशोधन हे रामन सिद्धांत म्हणून ओळखले जाते. त्यांनी ध्वनी आणि संगीत यावरील संशोधन केले. संगीत वाद्यांवर होणाऱ्या कंपनाचा अभ्यास केला.वाद्यांच्या ध्वनीतील गोडवा हा त्याच्या रचनात्मक स्वरूपावर अवलंबून असतो हे त्यांनी सिद्ध केले. रामन यांनी क्रिस्टल्स मधील प्रकाश प्रकीर्णनाचे निरीक्षण केले. यामुळे पदार्थाचे रासायनिक आणि संरचनात्मक गुणधर्म समजण्यात मदत झाली.त्यांच्या स्पेक्ट्रोस्कॉपी मधील संशोधनामुळे रसायनशास्त्र औषध निर्मितीत खगोलशास्त्र जीवशास्त्र यात मोठी प्रगती झाली. त्यांनी उष्णतेच्या आणि ध्वनीच्या परस्पर प्रभावाचा अभ्यास केला प्रकाशाच्या तरंग लांबी व उष्णतेच्या प्रक्रियांमधील संबंधाचा शोध लावला.त्यांच्या शोधांनी आधुनिक विज्ञानाला नवी दिशा दिली.त्यांचे संशोधन केवळ प्रयोगशाळे पुरते मर्यादित न राहता उद्योग रसायनशास्त्र वैद्यक आणि अंतराळ संशोधनातही उपयोगी पडले. भारतीय विज्ञान संस्थेचे संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानासाठी प्रेरित केले त्यांची विज्ञानाची आवड आणि चिकाटी त्यांना महान शास्त्रज्ञ बनवण्यासाठी उपयोगी पडली.त्यांनी नेहमीच विज्ञान केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून ज्ञानाची तपश्चर्या आहे हे विचार मांडl त्यांनी विज्ञानातील अनेक आव्हानांना तोंड दिले आणि स्वतःच्या प्रयत्नातून जागतिक स्तरावर मान्यता मिळवली. आयुष्यभर संशोधनाला वाहून घेतलेल्या सी व्ही रामन यांचे आयुष्य आपल्याला हेच सांगते "छोट्या शोधांमधूनच महान शोधांची बीजे रोवली जातात."
"प्रत्येक समस्या स्वतःसोबत एका संधीचे दारे उघडते; ती संधी शोधण्याचा प्रयत्न करा."

Comments
Post a Comment