गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १००
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -100-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे* 8308677799 8806150248 *मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म 24 एप्रिल 1973 साली झाला.त्याचे वडील प्राध्यापक होते.लहानपणापासून त्याला क्रिकेट ची प्रचंड आवड होती आणि गतीही होती.शारदाश्रम शाळेत असताना त्याचे क्रिकेट बहरले.शाळेत असताना त्याचा मित्र विनोद कांबळी आणि त्याने हॅरिष शिल्ड ट्रॉफी मध्ये 664 धावांची अभेद्य भागीदारी केली.पुढे रमाकांत आचरेकर गुरू म्हणून त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला क्रिकेट चे बारकावे अधिक समजले.तो क्रिकेट मध्ये इतका पारंगत झाला की तो क्रिकेट मधील भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडू झाला.तो जेव्हा खेळत असे तेव्हा लोक त्याला क्रिकेटचा चमत्कार म्हणत असे.तो मुलगा म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर*. ...