गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७५
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -75-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*सांगली जिल्ह्यातील शिराळा मधील कोकरूड येथे त्याचा जन्म 1 जून 1973 मध्ये झाला.त्याचे वडील त्या वेळी गावचे सरपंच व पैलवान होते.आपल्या मुलानेही पैलवान व्हावे अशी त्यांची इच्छा असते.जिल्हा परीषदेच्या शाळेत त्याचे सुरुवातीचे शिक्षण होते. वडील सरपंच असल्यामुळे त्याचा शाळेत दरारा होता शिक्षकही त्याला काही म्हणत नसे.पण एक दिवस शाळेतील बाई त्याच्या कानशिलात लगावतात आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः तयार कर असे सूनवतात.यातून तो पेटून उठतो .दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येतो.बारावीला उत्तम गुण असतानाही केवळ प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे म्हणून तो कला शाखेत प्रवेश घेतो.शिवाजी विद्यापीठातून सुवर्णपदक मिळवून बी ए ची परीक्षा उत्तीर्ण होतो.उस्मानिया विदयापीठातून एम बी ए करतो. तो मुलगा प्रचंड मेहनत घेऊन भारतीय प्रशासन सेवेत आय पी एस अधिकारी बनतो.तो मुलगा म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्त्व,कर्तव्यदक्ष,संवेदनशील असणारे अधिकारी विश्वास नांगरे पाटील*.
नांगरे पाटील यांनी आतापर्यंत अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक,मुंबई पोलीस उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस आयुक्त मुंबई दक्षिण विभाग,नाशिक पोलीस आयुक्त, सह आयुक्त मुंबई या विविध ठिकाणी सेवा करताना आपल्या कामाचा वेगळा ठसा समाज मनावर उमटवला.
*अतिशय संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातील सिंहगड पायथ्याशी डोंजे गावात झालेल्या रेव्ह पार्टी वर त्यांनी घातलेला छापा प्रचंड गाजला.26/11ला मुंबई वर हल्ला झाला तेव्हा ते कोणत्याही बुलेट फ्रुफ जॅकेट शिवाय ताज हॉटेल मध्ये शिरले.त्यांच्या प्रतिकाराने दहशतवादी नवीन इमारतीत जाऊ शकले नाही त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले.याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक प्रदान करण्यात आले.माझे डोळे मिटण्याआधी तू लाल दिव्याच्या गाडीतून घरी ये .वडिलांच्या याच वाक्यामुळे नांगरे पाटील आपले स्वप्न दिवस रात्र जगले.अनेक वेळा अपयश आले,डोळ्यातून पाणीही आले पण खचले नाही.*
*याच जिद्दीने 1997 साली त्यांनी 13 परीक्षेत यश मिळवले. ते आय पी एस झाले त्याच वेळी उपजिल्हाधिकारी, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, पी.एस.आय.फिजिकलटेस्ट असे एकामागून एक यश त्यांनी मिळवले होते.तुमच्याकडे प्लॅन बी तयार असेल तर स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर त्रागा होत नाही असे नांगरे पाटील सांगतात.लहानपणी पहाटे उठून अभ्यास करण्याची सवय लावणारे गायकवाड सरांचे नांगरे पाटील या यशात आभार मानायला विसरत नाही.विश्वास नांगरे पाटील यांच्या जीवनाकडे पाहताना हेच समजते आपले आयुष्य घडवायचा एक विशिष्ट काळ असतो.त्यावेळी उत्तम शिक्षक,आपली जिद्द,योग्य मार्गदर्शन,प्रचंड मेहनत हे सारे गुण तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातात*.

Comments
Post a Comment