गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६८

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -68-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                         *तिचा जन्म दिल्ली येथे 14 फेब्रुवारी 1933 मध्ये झाला.तिची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती.तिला लहानपणी असणारी अभिनयाची आवड  तिचे वडील अताउल्ला यांनी ओळखली होती.पण घरातून तिने अभिनय क्षेत्रात जाणे याला विरोध होतो.तरीही वडील ठामपणे लेकीच्या पाठीशी उभे राहतात आणि ती बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत येते.ती मुलगी म्हणजे अद्भुत सौंदर्य लाभलेली अद्वितीय अभिनेत्री मुमताज उर्फ मधुबाला*.                   


  'बॉम्बे टॉकीज  'हा मधुबालाचा पहिला चित्रपट.नंतर निलकमल,महल,आशा,कामिनी,हावडा ब्रिज,कालापाणी,मि अँड मिसेस फिफ्टी फाईव्ह, चलती का नाम गाडी यातील तिच्या खट्याळ,अवखळ भूमिका प्रचंड गाजल्या.अप्रतिम सौंदर्याबरोबर तिच्या अभिनयाचे श्रेष्ठत्व सुद्धा रसिकांना भावले.मधुबाला म्हणजे यश हे समीकरणच जणू त्यावेळी बनले होते.मुगल ए आझम यातील अनारकलीची  भूमिका मधुबाला ने अजरामर केली.बोलका।चेहरा,नजरेतील भावविशेष,मोहक हालचाली,आणि पद्मन्यासातील नजाकत यामुळे तिच्या भूमिका चिरस्मरणीय ठरल्या.                    एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या क्षेत्रात मापदंड मानली जाते तेव्हा ती एखाद्या शतकात,द्विशतकात,एकमेव अशीच असते.


**गेल्या शतकात सौंदर्याचें मापदंड ठरलेलं एकच नाव आजही पिढ्यान पिढ्याच्या तोंडी ऐकायला मिळते ते म्हणजे मधुबाला.सुमारे 71 चित्रपटातून काम करणाऱ्या मधुबाला यांनी नायकांच्या नावावर चित्रपट चालतात ही संकल्पनाच आपल्या उत्तम अभिनयाने मोडीत काढली हे साधेसुधे काम नव्हते.'व्हीनस ऑफ इंडिया 'म्हणून गौरव झालेल्या या अभिनेत्रीचे भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट काढून तिचा सन्मान केला आहे.मधुबाला यांचे जीवन संघर्षमय होते यातून त्यांनी मेहनतीने मार्ग काढला.त्यांचे जीवन हेच सांगते तुम्ही संकटावर स्वार व्हा मार्ग काढा मग येणाऱ्या अनेक पिढ्या तुमची आठवण काढतात*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०