गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७७

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -77-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248       


           

 *पंजाब राज्यातील फाजिल्का येथे  तिचा जन्म झाला.तिचे वडील ओ.पी.चड्ढा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF मध्ये अधिकारी होते.तिचे मॅट्रिक पर्यंत चे शिक्षण फाजिल्का येथे तर इंग्रजी साहित्यात एम .ए .जालंधर येथे झाले.सुरुवातीपासून ती प्रतिभावान विद्यार्थीनी होती.वाद विवाद,नाटक,क्रिकेट यात ती कायम सरस कामगिरी करायची.लग्नानंतरही आपले जीवन थांबू नये अशी तिची इच्छा असते.याच जिद्दीतून ती अभ्यासाला सुरवात करते.किरण बेदी यांना ती कायम आदर्श मानत होती. पुढे प्रचंड मेहनत घेऊन ती महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला पोलिस आयुक्त   बनते. ती मुलगी म्हणजे एक कर्तव्यदक्ष,तडफदार,लेडी सुपरकॉप  आय. पी. एस .डॉ मीरा बोरवणकर-चड्ढा*.                


मीरा यांनी मुंबई पोलीस उपायुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक औरंगाबाद, राज्य सी.आय.डी गुन्हेशाखा,CBI ची अपराध शाखा मुंबई, CBI भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग डी.आय.जी यासारखी अत्यंत महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली.या शतकात मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात प्रमुख असणाऱ्या एकमेव महिला म्हणजे मीरा बोरवणकर.त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रपती सेवा पुरस्कार, पोलीस सेवा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.


 *मुंबई मधील माफिया राज कमी करून त्यांनी कठोर अधिकारी ही आपली *प्रतिमा अधिक दृढ केली.जळगाव  जिल्ह्यात शालेय मुलींना देह व्यापारात गुंतवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांनी आपण लेडी सुपरकॉप आहोत हे दाखवून दिले.त्यावेळी त्यांनी अनेक प्रतिष्ठित लोकांना अटक करताना कुणाचीही गय केली नाही.त्यांच्या जीवनावर राणी मुखर्जी या अभिनेत्रीने भूमिका केलेला 'मर्दानी' हा चित्रपट प्रचंड गाजला.पाकिस्तानी दहशतवादी याकूब मेमनला त्यांच्याच निगराणी खाली फाशी दिली गेली.आय.ए. एस.असणारे  अभय बोरवणकर हे पती म्हणून मीरा यांच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभे राहिले.मीरा या ज्या काळात आय.पी.एस झाल्या तो काळ मुलींनी फार शिकण्याचा नव्हता,पण त्या थांबल्या नाहीत.वाहत राहिल्या झऱ्यातील स्वच्छ सुंदर नितळ  पाण्यासारख्या.आणि यशस्वी अशा झाल्या की सर्वांनी त्यांच्या कार्याला सलाम केला. त्यांचे आयुष्य हेच शिकवण देते सतत वाहते रहा,आपले विचार प्रवाही ठेवा.आपण थांबलो की साचलेपणा येतो.आपल्या जीवनाचा आनंद रोज नव्याने जगण्यातच आहे*.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०