गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९८

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -98-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248      

             


  *उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे त्याचा जन्म 27 डिसेंबर 1797 साली झाला.तो चार वर्षाचा असताना त्याचे वडील लढाईत मारले गेले.त्यांनतर काका आणि आजोबा यांनी त्याला लहानचे मोठे केले.मौलाना मुअज्जम व अब्दुस्समद या दोघांनी त्याला फारशी,उर्दू,भाषेत पारंगत गेले होते.भाषेच्या भक्कम बैठकीमुळे त्याला शायरी लिहणे सहज जमू लागले.ज्या काळात मुघल साम्राज्य मोडकळीस आले होते त्या काळात एका मुलाची दिल्लीत शायरी फुलत होती.त्याच्या शाहिरीतील कल्पना विलासमुळे उर्दू शायरीचा चेहरा मोहरा बदलून गेला.हजारो वाचकांच्या मनावर आजही त्याची शायरी अधिराज्य गाजवते.असा भारताला मिळालेला तो महान शायर म्हणजे मिर्झा असदुल्ला खान गालिब ऊर्फ मिर्झा गालिब*.         



गझल हा शब्द उच्चारताच त्याच्याशी संबंधित एकच नाव डोळ्यापुढे येते ते म्हणजे मिर्झा गालिब.गालिब हे उर्दू कवी मानले जात असले तरी त्यांनी लिहलेल्या  बऱ्याच रचना फारशी भाषेत आहे.गालिब हे सुधारकी विचारांचे होते.धार्मिक व सांप्रदायिक भेदभावाला त्यांनी जीवनात कधीच स्थान दिले नाही.गालिब यांना संवेदनशील मन आणि अद्भुत काव्यप्रतिभा ही ईश्वराने दिलेली देणगी होती.



 *गालिब यांनी अठरा हजार पेक्षा अधिक शेर रचले असे मानले जाते.पण त्यातील बरेच शेर फारशी भाषेत असल्यामुळे रसिकांपासून दूरच राहिले.त्यातील बाराशे च्या आसपास शेर उर्दू भाषेत आले.त्यामुळेच  गालिब जगभरात लोकप्रिय झाले.सगळे शेर जर उर्दूत आले असते तर गालिब यांची उंची आहे त्या पेक्षा अधिक नक्कीच वाढली असती.गालिब यांचे 'कुल्लीयात इ गालिब' हा फारशी कवितांचा संग्रह,दिवाण इ गालिब,मिहर ह निमरोज, कल्लीयात इ नस्त्र,पंज गंज  यासारखे  गद्यग्रंथ प्रसिद्ध झाले.शायरीचे संपूर्ण रंगरूप बदलणारे गालिब खऱ्या अर्थाने वेगळे यासाठी ठरतात की सामान्य माणसाच्या मनातील भावना ते आपल्या शायरीत मांडायला यशस्वी झाले.म्हणून ते लोकांना आपले वाटले.आणि शायरी या प्रांतात प्रचंड यशस्वी झाले.यावरून आपल्याला हाच बोध मिळतो ज्यांना बोलता येते त्यांनी बोलते व्हावे,ज्यांना लिहता येते त्यांनी लिहते व्हावे,आणि समाज मन प्रेरित,व शिक्षित करत जावे*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०