गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९३

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -93-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248 


                        *त्याचा जन्म मुंबई येथे 9 मार्च 1951 साली झाला.त्याचे वडील उस्ताद अल्लारख्खा प्रसिद्ध तबलावादक.त्यांच्याच कल्पनेतून आणि रियाजातून तयार झालेल्या पारंपरिक तबलावादनातून तबलासंगत व एकलवादन या दोन्हीमध्ये त्याने स्वतःची अशी एक शैली निर्माण केली.आपल्या स्वतःच्या विदवत्तेने त्यात आणखी भर खातली.त्याने तरुणपणी अनेक मोठमोठया गायक कलाकारांना साथ संगत दिली.भारतीय  संगीतातील ठेका,लय,तालाचे विश्व,म्हटले की त्याचे नाव प्रथम समोर येते.भारतीय संगीताचे वेगळेपण देश विदेशात पोहचवणारा तो मुलगा म्हणजे तबल्याचा जादूगार उस्ताद झाकीर हुसेन*. 


                                       झाकीर हुसेन यांच्या कलेचा सन्मान म्हणून त्यांना पदमश्री,पदमभूषण, ग्रॅमी ,भारत-अमेरिका,संगीत- नाटक अँकॅडमी यासारखे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आला.तबला आणि डग्यावर वाजू शकणारे सर्व नाद त्यांच्या हातून स्पष्ट आणि नेमकेपणाने वाजत.मग तो नाजूक किनकिनाट असो किंवा नगाऱ्यासारखा दणदणाट असो.त्यातून निघणाऱ्या बोलातला ठेका आणि ताल हा वाखाण्याजोगाच.तबला या वाद्यावर त्यांची बोटे अक्षरशः हुकमुत गाजवत असे.     


                *झाकीर हुसेन कोणत्याही गायक किंवा वादकाला साथ देताना गायकाच्या गाण्याशी आणि वादकाच्या तलाशी त्यांच्या ढंगा प्रमाणे एकरूपता साधून गायनाला किंवा वादनाला वेगळे सौंदर्य प्राप्त करून उच्च पातळीवर नेऊन ठेवत असे.पाश्चिमात्य संगीत वादानालाही त्यांनी साथ संगत केली आहे.हिंदुस्थानी ताल वाद्य व पाश्चिमात्य ताल वाद्य यांचा मेळ घालण्याचे काम झाकीर हुसेन यांनी केले.प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी तबला वाद्यावर  हुकूमत गाजवली.यामागे त्यांची अथक साधना होती.प्रचंड मेहनत होती.यावरून हाच संदेश मिळतो यशासाठी दिवस रात्र मेहनत घ्यावी लागते.तसे केले तरच तुम्हाला यशाचा झेंडा अभिमानाने खांद्यावर घेऊन मिरवता येतो*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०