गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७९
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -79-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*लष्कराचा वारसा असणाऱ्या घरात तिचा जन्म 4 जून 1975 मध्ये झाला.वडील आणि भाऊ भारतीय लष्करात असल्यामुळे तीही लष्करात जाण्याचा निर्णय घेते. दिल्ली येथील हंसराज कॉलेज मधून आपले शिक्षण ती पूर्ण करते.त्याचबरोबर सफरजंग फ्लाईंग क्लब मध्येही तीने पायलट चे बेसिक शिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय सशस्त्र दलाची परीक्षा ती उत्तीर्ण होते.ही परीक्षा उत्तीर्ण होणारी 25 प्रशिक्षित पायलट मध्ये ती एकमेव महिला पायलट असते.पुढे ती मुलगी आपल्या अदभुत धाडसाने कारगील युद्धात आघाडीवर हेलिकॉप्टर चालवून अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवते.हे अतुलनीय शौर्य गाजवणारी ती मुलगी म्हणजे गुंजन सक्सेना*.
गुंजन यांनी कारगील युद्धात जे अचाट धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचा शौर्य पदक देऊन सन्मान केला आहे.हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट आहेत.कारगील युद्धात जखमी सैनिकांना प्राथमिक उपचार, जेवण पोहचवणे हे काम त्यांनी आपल्या 'चिता हेलिकॉप्टर 'च्या सहाय्याने उत्साह व चपळतेने केले.पाकिस्तानच्या हालचालींवर देखरेख ठेवताना त्यांच्या चिता हेलिकॉप्टर वर एकदा हल्लाही झाला त्यातून त्या थोडक्यात बचावल्या.पण न डगमगता त्यांनी पुन्हा युद्धात आपले काम सुरू ठेवले.
*कारगील युद्धात सैनिकांना मदत करणाऱ्या 10 पायलट बरोबर काम करणाऱ्या एकमेव महिला पायलट गुंजन सक्सेना होत्या.नवीन पायलट असूनही तेरा हजार फुटावर हेलिकॉप्टर उडवून त्यांनी 20 दिवसात 10 वेळा सैनिकांना अशी मदत केली.त्यांनी विजय व सफेद सागर या मोहिमा यशस्वी केल्या.त्यांच्या या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारने 'The kargil girl 'ही उपाधी सन्मानाने दिली आहे. जान्हवी कपूर या अभिनेत्रीने भूमिका केलेला त्यांच्या जीवनावरील' गुंजन सक्सेना द कारगील गर्ल 'हा चित्रपट प्रचंड गाजला आहे.गुंजन यांना पाकिस्तानी सीमेलगत अनेक वेळा जावे लागत असे.जीवाला प्रचंड धोका असे पण त्या कधीही डगमगल्या नाही.त्यांचे जीवन समस्त महिला वर्गाला हाच संदेश देते की तुमच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास व चिकाटी असेल तर एक स्त्री मनात आणले तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतेच होते *.*

Comments
Post a Comment