गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -89-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248        

              


 *अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथे त्याचा जन्म 1960 मध्ये झाला.जिल्ह्याच्या ठिकाणापासून 15 किमी गाव पण कुठलीही विशेष अशी सुधारणा गावात नाही.1972 च्या दुष्काळानंतर परिस्थिती तर आणखी वाईट झालेली होती.अडीचशे ते चारशे मिली पावसाचे प्रमाण त्यामुळे गावात पाण्याची भीषण टंचाई.शेतीला पाणी नाही त्यामुळे गावातून शहराकडे  स्थलांतर करणारे लोक खुप होते. जे तरुण शिकले ते शहरात स्थायिक झाले.गावातील भयाण परिस्थितीची ना कुणाला खंत ना बदलण्याची उर्मी.अशा वेळी एक तरुण गावात पहिला पदव्युत्तर पदवी घेऊन एम.कॉम होतो.1989 च्या काळात सहज नोकरी मिळत असतानाही गाव न सोडण्याचा निर्धार करतो. गावतील परिस्थिती बदलण्यासाठी प्रचंड संघर्ष करतो.साऱ्या गावाला सारे तंटे विसरायला लावून एका छताखाली आणतो.पुढे त्या गावचे नाव देशात नाही जगात आदर्श ग्राम म्हणून घेतले जाते ते गाव म्हणजे आदर्श गाव हिवरे बाजार आणि हे शाश्वत काम करणारा तो मुलगा म्हणजे आदर्श सरपंच पदमश्री पोपटराव पवार*.    

                  

  ग्रामविकास, जलसंधारण, मृदासंधारण,जलव्यवस्थापन, वृक्षलागवड,दुग्धक्रांती,गोबर गॅस,गांडूळखत, या साऱ्या क्षेत्रात पोपटराव यांनी ग्रामस्थांच्या बरोबर केलेल्या स्वप्नवत कामाचा सन्मान म्हणून गावाला आदर्श गाव,यशवंत ग्राम,निर्मल ग्राम,वन ग्राम, राष्ट्रीय जल ग्राम,स्वच्छता अभियान, तंटामुक्त ग्राम,यासारखे असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.तर पोपटराव यांचा पदमश्री,राष्ट्रीय विश्वरत्न, कृषिरत्न, वनश्री संत तुकाराम यासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरव केला गेला आहे.पडीक जमिनीवर झाडे लावणे, समतल चर खोदून पाणी अडवणे,गावातील जमिनी गावाबाहेरील व्यक्तींना न विकणे, ऊस, केळी ही जास्त पाण्याची पिके गावात न घेणे,गावात बोअरिंग न घेणे, धोबीघाटावर कपडे धुणे,शौचालय वापरणे, लग्नापूर्वी HIV चाचणी करणे,यासारखे अनके निर्णय ग्रामसभेने घेतले ते मंजूर झाले,ते सर्वांनी पाळले म्हणून आज हिवरे बाजार यशस्वी गाव आहे.   

          

 *1989 साली तरुण सरपंच ते आजचे पोपटराव खूप काळ लोटला आहे पण काम करण्याची तीच उर्मी आजही विविध ठिकाणी व्याख्याने देताना जाणवते.पदमश्री हा सन्मान एका गावच्या सरपंच असणाऱ्या माणसाने मिळवणे ही साधी गोष्ट नाही,गावासाठी पोपटराव कित्येक वर्षे झिजले म्हणून हे शक्य झाले.ग्रामसभेला लोक येत नाही म्हणून प्रत्येक घरात ग्रासभेच्या विषयाचा कागद वाटप करून गावकऱ्यांचा  गावच्या विकासात लोकसहभाग वाढवणारे पोपटराव,एकाच वेळी साऱ्या गावाची जमीन मोजणी करणारे पोपटराव हे दुर्मिळ सरपंच आहेत.पोपटराव पवार यांनी आपण मोठे होताना आपले गाव आपल्यापेक्षा मोठे झाले पाहिजे,नावारूपाला आले पाहिजे हा विचार नेहमी केंद्रस्थानी ठेवला.सर्वाना बरोबर घेऊन पुढे जात राहिले आणि हिवरे बाजार जगाच्या नकाशावर ठळक अक्षरात कोरले गेले.पोपटरावांचे आयुष्य हेच सांगते की कुठून तरी सुरुवात केली की रस्ता तयार होत जातो.एकदा का रस्ता तयार झाला की मार्ग आपोआप सोपा होतो*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०