गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७२

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -72-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                       


*युक्रेन कीव येथे त्याचा जन्म 24 फेब्रुवारी 1976 मध्ये झाला.तो 16 वर्षाचा असताना काही कौटुंबिक कारणाने त्याची आई वडिलांपासून विभक्त होते.आई आणि आजी बरोबर तो अमेरिकेला येतो.गरिबी, संघर्ष जणू त्याला जन्मताच मिळाला होता.आई आयाचे काम करून कुटुंबाचा गाडा रेटत होती.तो एका दुकानात काम करायचा. पुढे सिलिकॉन व्हॅली मध्ये सरकारी शिक्षण घेऊन तो याहू मध्ये कामाला लागतो. सात वर्षे तेथे नोकरी करून तो ब्रायन ऍक्टन या मित्रांच्या मदतीने फक्त मोबाईल क्रमांकावर चालणारे व सर्वांना सहज संवाद साधता येईल अशी सोशल नेटवर्किंग ॲप बनवतो.ते ॲप अब्जावधी लोकांचे जीवन व्यापून टाकते.ते ॲप म्हणजे Whats app आणि ते तयार करणारा तो मुलगा म्हणजे जेन कूम*.         


  जेन याहू मध्ये काम करत असताना त्यांना ब्रायन ऍक्टन मित्र भेटतो दोघे 9 वर्षे काम करून सर्वाना सहज संवाद साधता येईल,फक्त मोबाईल नंबर वर चालेल असे मेसेज ॲप बनवण्याची कल्पना मांडतात.2009 साली ती प्रत्यक्षात उतरवतात.प्रथम फक्त ॲपल मोबाईल वर चालणारे हे ॲप 2010 नंतर स्मार्टफोन मध्ये जसे आले तशी त्याची लोकप्रियता शिखरावर पोहचली.पहिल्या पाच वर्षात 45 कोटी युजर्स असणारे एकमेव ॲप म्हणजे व्हाट्सएप.दोनशे करोड पेक्षा अधिक लोक आज हे ॲप वापरतात. यावरून दररोज सरासरी एक अब्ज मेसेज पाठवले जातात.व्हाट्सएप चे एक वैशिष्ट्य म्हणजे हे वापरत असताना कोणतीही जाहिरात मध्ये येत नाही.फोटो,व्हिडीओ,कागदपत्रे,आपले विचार,मनसोक्त गप्पा, असे सारे तुम्ही यावरून एकमेकांना पाठवू शकता. शिवाय तुमच्या गोपनियेतला कुठेही बाधा येत नाही.व्हाट्सएप पे,व्हाट्सएप बिझनेस ॲप,हे व्हाट्सएपच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे आविष्कार आहेत.                                    



*वयाच्या 35 व्या वर्षी जेन याने काहीतरी वेगळे करायचे म्हणून  व्हाट्सएप सुरू केले.ज्या फेसबुक कंपनीने जेनला त्यांच्या कंपनीत काम देण्यास नकार दिला त्याच फेसबुक ने 19 बिलियन म्हणजेच एक लाख तेवीस हजार कोटीला व्हाट्सएप विकत घेतले.जिद्द ही अशी असावी.जेन फेसबुक मध्ये कामाला लागला असता तर कदाचित व्हाट्सएप निर्माण झालेही नसते.सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करणारा जेन,परिस्थितीमुळे सरकारी खानवळीत लाईन मध्ये उभे राहून जेवण घेणारा जेन,शिक्षण संपल्यावर जुनी पुस्तके विकून खर्च भागवणारा जेन यांचे आयुष्य पाहिले की सहज मनात विचार येतो परिस्थिती सर्वांवर वाईट वेळ कधी न कधी आणत असते.फक्त आपण त्यापुढे किती खचतो किंवा धैर्याने उभे राहतो यावर आपले जगणे आणि जिंकणे अवलंबून असते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०