गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८१
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -81-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *उत्तराखंड मधील उत्तरकाशी नकुरी येथे तिचा जन्म 25 मे 1954 मध्ये झाला.लहानपणापासून ती अभ्यासात चांगली होती.पुढे ती बी एड पर्यंत चे शिक्षण घेते.हुशार असूनही तिला कुठेही कायमस्वरूपी नोकरी मिळत नाही.तात्पुरत्या नोकऱ्यांना कंटाळून ती नोकरी करण्याऐवजी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंट कॅम्प मध्ये अर्ज दाखल करते.येथून पुढे तिच्या आयुष्याला नवीन दिशा मिळते.मग ती मुलगी मागे वळून पहात नाही.आपल्या मेहनतीच्या जोरावर गिर्यारोहिका बनते.पुढे ती मुलगी 23 मे 1984 मध्ये सागरमाथा एव्हरेस्ट च्या शिखराच्या 29028 फूट (8848मीटर)उंचीवर भारताचा तिरंगा डौलाने फडकवते. एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील ती पहिली महिला ठरते.हा मान मिळवणारी ती मुलगी म्हणजे एव्हरेस्ट वीरांगना बछें
द्रि पाल*.
1984 साली भारताचे चौथे एव्हरेस्ट अभियान सुरू झाले याची एक टीम बनवली होती.यात पाल या एक होत्या. त्यांच्या या अतुलनीय साहसाबद्दल त्यांना भारतीय पर्वतारोहन फाउंडेशन कडून सुवर्ण पदक,पदमश्री,अर्जुन पुरस्कार, उत्तर प्रदेश शिक्षण विभाग सुवर्णपदक,कोलकता लेडीज ग्रुप स्टडी अवार्ड,नॅशनल अडवव्हेंचर अवार्ड भारत सरकार,मध्य प्रदेश सरकारकडून वीरांगना लक्ष्मीबाई राष्ट्रीय सन्मान यासारखे असंख्य सन्मान मिळाले.
*1994 मध्ये गंगा नदी मध्ये हरिद्वार ते कलकत्ता पर्यंत 2500 किमी पर्यंत लांब नौका अभियानाचे नेतृत्व त्यांनी केले.हिमालयातील भूतान,नेपाळ, लेह आणि सियाचीन येथून पुढे जात काराकोरम पर्वत शृंखलावर जाऊन थांबणारा 4000 किमीचा पल्लाही त्यांनी पूर्ण केला होता.येथेही जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.पाल यांनी सुरुवातीला गिर्यारोहण हा पेशा निवडला तेव्हा नातेवाईक,परिवार यांचा प्रचंड विरोध झाला.पण पाल यांचा निश्चय पक्का होता.त्या कुठेही डगमगल्या नाही .आपल्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत.त्यांनी प्रचंड मेहनत घेत हेच दाखवून दिले की जगातील उंचावरील शिखरावर महिला जाऊ शकते.जशी ती नैसर्गिक शिखरावर पोहचू शकते तशी ती दृढनिश्चयी झाली तर कोणत्याही परिस्थितीत,कोणत्याही क्षेत्रात,अतिउच्च स्थान मिळवू शकते.कारण पोलादी कणखरता फक्त स्त्री कडेच असते*.

Comments
Post a Comment