गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग- ९२


 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -92-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
    8308677799
    8806150248 

                      *पश्चिम बंगाल राज्यातील कोलकता येथील सिमलापल्ली येथे त्याचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला.त्याचे वडील विश्वनाथ दत्त हे उच्च न्यायालयात वकील तर आई भुवनेश्वरीदेवी यांना अध्यात्माची प्रचंड आवड.घरात प्रथम पासून शांत संयमी वातावरण याच वातावरणाचा परिणाम त्याच्यावर झाला.लहानपणी प्रचंड बुद्धिमान बालक म्हणून त्याची ख्याती होती.अभ्यासाबरोबर व्यायाम,कुस्ती,पोहणे,घोडेस्वारी, लाठीयुद्ध,गायन,वादन,साहीत्य, साऱ्या क्षेत्रात लीलया संचार करत असे.पुढे तो मुलगा बी.ए ची पदवी संपादन करून तर्कशास्त्र,युरोपचा इतिहास यांचा अभ्यास करतो.आणि भारताचे पाश्चिमात्य जगात भारताचे अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिनिधित्व करतो.तो ओजस्वी आणि तेजस्वी मुलगा म्हणजे नरेंद्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद*.   
                               त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला।जातो.विवेकानंद यांनी भारतात आणि विदेशात भाषणे देताना वेदांत,योग्य व भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून दिलीच त्याशिवाय हिंदू धर्माचा मानवतावादीचेहरा जगासमोर आणून जगाला शांततेचा संदेश दिला.त्यांनी 1993 साली अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेच्या भाषणाची सुरुवात'माझ्या प्रिय  बंधू भगिनींनो'अशी करताच सलग दोन मिनिटे झालेल्या टाळ्यांचा कडकडाट जग अजूनही विसरले नाही.रामकृष्ण परमहंस विवेकानंद यांना गुरू म्हणून लाभले आणि संन्याशाची दीक्षा घेत ते विवेकानंद झाले. त्यांनी त्यांचे अवघे जीवन बदलून टाकले.विवेकानंद यांनी रामकृष्ण मठ व रामकृष्ण आश्रम या माध्यमातून देश विदेशात त्यांचे विचार  पोहचवले. 
                          *तत्वज्ञान,धर्म,इतिहास,सामाजिक,विज्ञान,कला,साहित्य,वेद,उपनिषदे,विविध धर्मग्रंथ यांचा प्रचंड अभ्यास केल्यावर त्यांनी सर्व धर्म एक आहे,त्या सर्वांचे उद्दिष्ट मानव कल्याण हेच आहे हे सूत्र जगाला दिले.अमेरिकेतील वृत्तपत्रांनी त्यांना भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमह्त्वाचा संन्याशी,दैवी वक्तृत्वाचा धनी ही विशेषणे दिली.कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर विवेकानंद यांचे स्मारक आहे.कोलकत्यातील बेलूर मठात 4 जुलै 1902 मध्ये समाधी घेताना मी चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही हे शब्द त्यांनी खरे करून दाखवले.थोड्याच मिळालेले त्यांचे आयुष्य आपल्याला हीच शिकवण देते संघर्ष करणे जितके कठिण असले तितके तुमचे यश शानदार असेल.असे कधीच म्हणू नका की मी करू शकत नाही तुम्ही अनंत आहात तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.उठा जागे व्हा ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका*.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०