गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - ८४
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -84 -*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*आसाम राज्यातील जोरहाट येथे त्याचा जन्म 1963 मध्ये झाला.ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील हे शहर.तो येथील माजूली बेटावर राहत असे.नदीला पूर आला की ती अक्राळविक्राळ रूप धारण करत असे आणि सगळे काही नष्ट होत असे.हे सगळे पाहून त्याचे मन अस्वस्थ होत असे.तो 16 वर्षाचा असताना याचे कारण बेटवरील लोकांना विचारले तर या मातीत झाडे येत नाही,म्हणून पाणी अडायला जागा नाही असे त्याला सांगितले. तो वनविभागाकडे झाडे आणायला गेल्यावर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते.त्याची समजूत काढावी म्हणून त्याला बांबूची झाडे दिली जातात.तो ती झाडे लावतो वाढवतो. त्याला झाडे लावायचा छंदच लागतो.पुढे तो मुलगा सुमारे 36 वर्षे अव्याहत पणे इतकी झाडे लावतो की सुमारे चौदाशे एकरवर जंगल उभे करतो.त्याच्या या कार्याची नोंद भारतातच नाही तर जगात घेतली जाते.हे अशक्यप्राय काम करणारा तो मुलगा म्हणजे द फॉरेस्ट मॅन जादव पायेग*. आपण आपल्या घरापुढे झाडे लावतो.फार तर बगीचा करतो पण या अवलिया माणसाने चौदाशे एकर जंगल उभे करून अनेक प्राणी,पशू, पक्षी यांना हक्काचे घर दिलेच पण आपल्या वेगळ्या कामाने अवघ्या जगाला तोंडात बोटे घालायला लावली.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पदमश्री,फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया, आसाम व काझीरंगा विध्यापीठाकडून डॉक्टरेट,यासारखे सन्मान मिळाले.त्यांनी निर्माण केलेल्या मुलाई कथोली या जंगलावर ब्रिटन मध्ये तयार केलेल्या डॉक्यूमेंट्रीला अनेक पुरस्कार मिळाले. *फक्त दहावी शिक्षण झालेल्या जादव यांनी तयार केलेल्या जंगलात हजारो दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत.रॉयल टायगर,पट्टेरी वाघ,अस्वल,हरणे,गवे, असे अनेक प्राणि येथें हक्काने राहतात. सासरी रहाणारी मुलगी जशी काही दिवस माहेरी येते तसे काझीरंगा मधून गेंडे तर अरुणाचल प्रदेश मधून हत्ती येथे तीन चार महिने मुक्कामी येतात आणि विशेष म्हणजे परत जातात.बांबू,साग,काटेसावर,सुबाभूळ,कदंब,ऐन असे 110 प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.जादव याचे इतके मोठे काम पाहिले कुणालाही माहीत नव्हते.जितू कालीता या पत्रकाराने प्रतीक मासिकातून हे काम जगासमोर आणले.मग आसाम राज्य सरकार व भारत सरकार यांनी जादव यांना या कामात वनविभागाची फौज दिली.जादव यांचा 20 बाबूंच्या रोपांपासून सुरू झालेला प्रवास इतका दूरवर गेला की पाहणाऱ्या लोकांच्या नजरा कमी पडल्या.यावरून एकच शिकवण मिळते वेगळे काम करताना मी एकटा आहे असा कधीच विचार करू नका.तो एकटेपणाच कदाचित तुमच्या हातून तुम्ही एक दंतकथा बनून जाल असे काम घडविल*.

Comments
Post a Comment