गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७८

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -78-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248      

                   


*तिचा जन्म कर्नाटक राज्यातील धारवाड येथे 15 ऑक्टोबर1960 मध्ये एका मराठी कुटूंबात झाला.वडील चंद्रकांत इंजिनिअर तर आई हेमलता प्राध्यापिका.आजी आजोबा प्रमाणे आपणही डॉक्टर व्हावे अशी तिची सुरुवातीपासून मनातील इच्छा होती.पुढे ती पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात बारावी पर्यंत चे शिक्षण घेते. ती मुलगी ठरवून लष्करातील सैन्याला आरोग्य सेवा देणारे डॉक्टर ज्या ठिकाणाहून शिक्षण घेतात अशा ए.एफ.एम.सी कॉलेजला एम.बी बी.एस.ला प्रवेश घेते.एम बी बी एस च्या तिन्ही टप्यात प्रथम येण्याचा पराक्रम करते.तिला आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज(AFMC) मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक मिळते.शिशुरोग तज्ञ  यात ती एम डी पर्यंत शिक्षण घेते.पुढे भारतीय लष्करातील रणगाडा विभागात देशसेवेसाठी दाखल होते.स्वतःची प्रचंड मेहनत,कामाप्रति निष्ठा या जोरावर ती मुलगी महाराष्ट्रातील पहिली व देशातील तिसरी महिला लेफ्टनंट जनरल बनते.ती मुलगी म्हणजे लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर*.               



 डॉ.माधुरी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशिष्ट सेवा पदक,अति विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मान केला आहे.पंतप्रधान कार्यालयातील सायन्स टेकनोलॉजी विभागाच्या सल्लागार समिती सदस्य त्या राहिल्या आहेत. AFMC  मेडिकल कॉलेज मध्ये प्राध्यापक, शिशु विभाग प्रमुख, अनेक विदयापीठाच्या परीक्षक,कॉन्बॉट मेडिसिन प्रमुख असणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी,यासारख्या असंख्य जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पेलल्या. "मी स्वतःला कधीच कुठे कमी समजले नाही,लष्करात जाणे  माझे स्वप्न होते ते मी जगले आणि पूर्ण केले "हे त्या आवर्जून नमूद करतात.                                   



*भारतीय लष्करातील पहिल्या प्रशिक्षित पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे डॉ.माधुरी कानिटकर. लष्करात जेथे कायम स्वरूपी हॉस्पिटल नाहीत अशाही जागी त्यांनी तात्पुरत्या बराकित राहून लष्कर सेवा केली.आसाम, अरुणाचल प्रदेश, दक्षिण व उत्तर भारत अशा अनेक ठिकाणी त्यांनी देशसेवा केली.संदेशवहनाची अत्यंत कमी साधने त्या काळी होती,पती-पत्नी एकत्र धोरण अमलात आले नव्हते असे असताना पती राजीव यांचा दुरावा सहन करत 24 वर्षे इतर  ठिकाणी सेवा केली.पती राजीव कानिटकर व डॉ.माधुरी कानिटकर हे पती-पत्नी दोघेही स्वतःच्या कर्तृत्वावर भारतीय लष्करात लेफ्टनंट जनरल झाले.असे लष्कर इतिहासात कधीही झाले नाही.लष्करातील निवृत्ती नंतर नाशिक मधील महाराष्ट्र आरोग्य विधदयापीठाच्या कुलगुरू असणाऱ्या डॉ.माधुरी यांच्या जीवनाकडे पाहताना हीच शिकवण मिळते की लष्करात मुलींनी सेवा करणे ज्या काळात केवळ एक स्वप्न होते.त्या मात्र ते स्वप्न जगल्या आणि यशस्वी झाल्या.म्हणून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा संयम ठेवा. यशस्वी होण्याची वेळ प्रत्येकाची येत  असते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०