गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७६

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -76-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248       

                  


 *हरियाणा राज्यातील कर्नाल येथे तिचा जन्म17 मार्च 1962 साली झाला.आई संयोगीता,तर वडील बनारसीदास यांचा  स्वतःचा टायर चा व्यवसाय होता.तिला लहानपणी सर्वजण मॉन्टी म्हणत असे.रात्रीच्या वेळी गच्चीवर जाऊन बसून तिला चांदण्या पहाणे खुप आवडत असे.तिच्या खोलीत चांदण्या,विमान,रॉकेट यांची चित्रे लावलेली असे.ती लहानपणी अत्यंत तल्लख बुद्धीची होती.कर्नाल सारख्या गावात मुलींनी शिकावे असे वातावरण नव्हते.सोळा सतरा वर्षाची मुलगी झाली की लग्न करून देत असे.पण वडिलांनी सर्व विरोध झुगारून लेकीचा विमान विद्या म्हणजेच पंजाबच्या एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग कॉलेज ला प्रवेश घेतला.तिनेही या संधीचे सोने करत अगदी शेवटच्या वर्षी अमेरिकेत जाऊन याचे शिक्षण घेते.यात एम सी,डॉक्टरेट होण्याचा अनोखा पराक्रम ती करते.पुढे ती मुलगी अमेरिकास्थित भारतातील पहिली अंतराळवीर बनते.हे अद्भुत यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे एक तेजस्वी चांदणी कल्पना चावला*.              



मोठमोठया पगाराच्या नोकऱ्या तिला मिळत होत्या. पण तिचे ध्येय होते अंतराळात जाणे.पुढे कल्पना यांची अनेक स्पर्धकातून नासा ने संस्थेत निवड केली.1975 पासून रीतसर  अंतराळवीर  प्रशिक्षण सुरू होते.पुढे1997 मध्ये तिची कोलंबो यानाची  'मिशन स्पेसिलिस्ट'म्हणून निवड  होते.16 दिवस अनेक महत्त्वाचे प्रयोग करून ती पृथ्वीवर परत येते.त्यावेळी देशभर दिवाळी साजरी होते.*2003 साली पुन्हा तिची याच मिशन साठी निवड होते.अंतराळवीर ठरल्याप्रमाणे  सर्व मोहीम यशस्वी करून पृथ्वी कडे परतत होते.पण हे यान पृथ्वीवर परत येताना यानाचे उष्णतेपासून संरक्षण करणाऱ्या विटातील एक वीट केव्हातरी कोसळली होती. हवेच्या घर्षणाने  यानाचे तापमान 1200 सेल्सिअस पर्यंत वाढले आणि काही कळायच्या आत यानाचे तुकडे तुकडे झाले. कल्पनाजी सह सर्व अंतराळवीरांची काळी ठिक्कर पडलेली शरीरे क्षणात खाली कोसळली.टेक्ससाच्या वाळवंटात  यानाचे अनेक तुकडे विखुरले गेले. 


*भारत सरकारने कल्पनाजी च्या स्मरणार्थ एका उपग्रहाला 'कल्पना' हे नाव दिले आहे.आपल्या देशावर प्रचंड प्रेम असणाऱ्या कल्पनाजी यांनी *अमेरिकेत विवाह करूनही आपले स्वतःचे नाव शेवटपर्यंत कल्पना चावलाच ठेवले. ईश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा होती.तिचे गीतेतील श्लोक  *तोंडपाठ होते.आज कल्पनाजी आपल्यात नाहीत पण यांचे  आयुष्य अनेक लोकांना प्रेरणा देत आहे आणि आपल्याला हेच सांगत राहते तुम्हाला *आजूबाजूला थोरा मोठ्यांचे सानिध्य लाभले तर तुम्हीही तसाच थोर विचार करता आणि आपले जीवन योग्य मार्गाने घडवता*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०