गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ६९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -69-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248    

                      

 *महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील माकेगाव  येथे त्याचा जन्म 12फेब्रुवारी 1957 मध्ये झाला.आई अंजनाबाई तर वडील पुंडलिक  .हे शेतकरी कुटूंब. त्याच्यासह घरात दोन भाऊ,चार बहिणी अशी एकूण सात भावंडे.घरात प्रचंड गरिबी असली तरी आपला मुलगा इतर मुलांसारखा शिकून मोठा झाला पाहिजे ही आईची तीव्र इच्छा होती.तो मुलगा शाळेत जातो शिक्षण घेता घेता गुरे सांभाळणे,पेरणी,खुरपणी,साळ बडवणे,अशी कामे करतो.वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवून,कमवा शिका योजनेत काम करून शिक्षण पूर्ण करतो इतक्या कठीण परिस्थितीतही बोर्डाच्या परीक्षेत दहावा येतो.पुढे तो मुलगा MBBS डॉक्टर बनतो.त्याच्या दोनीही किडन्या निकामी झाल्यावर आईने दिलेल्या एका किडणीवर जगताना पुढील सारे समाजासाठी देण्याची शपथ घेतो. ते कार्य तो इतके नेटाने करतो की दीड लाख लोकांच्या डोळ्यावर तो यशस्वी बिनटाका शस्रक्रिया करतो.पुढे तो मुलगा महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचा संचालक बनतो.तो मुलगा म्हणजे महान नेत्र तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव पुंडलिक लहाने*.                          


तात्याराव यांनी केलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पदमश्री,छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,आचार्य अत्रे जीवन गौरव, यासारखे अनेक पुरस्कार मिळाले.बीड,धुळे,जे.जे हॉस्पिटलमध्ये आपली उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर 18 ते 23 तास काम करत.जे जे हॉस्पिटलचा चेहरा मोहरा बदलण्यात डॉक्टरांचा वाटा मोठा आहे.जगात सर्वाधिक 1700 पेक्षा अधिक कुष्ठरोग्यांच्या डोळ्यांची यशस्वी शास्रक्रिया  करणारे तात्याराव कोरोना काळात आयुष टास्क फोर्स,पेडियाट्रिक टास्क फोर्स चे सदस्य आहेत.यात कोरोना उपचारासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली आहे.                                 


*160 टाक्यांची जखम स्वतःच्या शरीराला देऊन माझा तात्या जगला पाहिजे म्हणून आपली किडनी देणारी माऊली तात्यांना मिळाली.म्हणून डॉ. तात्या लहाने इतके मोठे काम उभे करू शकले.ज्या भागात सरकारी यंत्रणा याआधी गेली नव्हती तेथील दुर्गम भागात विविध शिबिरे घेऊन त्यांनी लाखो लोकांच्या डोळ्यात प्रकाश दिला.जणू लाखो कुटूंबेच उभी केली.कमवा शिका योजनेतून रोज 50 घागरी झाडांना पाणी घालणारे तात्या,स्वतः मेस चालवून शिक्षणाचा खर्च भागवणारे तात्या,कित्येक दिवस एकच शाळेचा ड्रेस वापरणारे तात्या आताच्या पिढीसाठी आदर्श आहेत.ते यासाठी की कितीही कठिण काळ असला तरी संघर्षाची शस्रे कधीच म्यान करू नका.निर्णायक  क्षणापर्यंत लढत राहणे हेच वीरांचे लक्षण असते.हेच डॉ. लहाने नी केले म्हणूनच ते खरेखुरे हिरो आहेत*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०