गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८३

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -83-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248      

               


*बिहार राज्यातील रांची मध्ये त्याचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये झाला.त्याचे वडील पानसिंह हे मेकॉन येथे कनिष्ठ पदावर व्यवस्थापक तर आई देवकीदेवी ही गृहिणी.रांची मधील श्यामली मधील जवाहर विद्या मंदिर येथे त्याचे शालेय शिक्षण झाले.लहानपणीच त्याला खेळाची प्रचंड आवड होती.तसा तो शाळेत असताना अँथलेटिक्स चा विद्यार्थी.फुटबॉल आवडता खेळ म्हणून तो शालेय टीममध्ये  तो गोलकीपर होता.पण एक दिवस त्याचे फुटबॉल प्रशिक्षक त्या मुलाला स्थानिक क्रिकेट क्लब मध्ये विकेटकीपर म्हणून पाठवतात तेथून पुढे त्याला क्रिकेट खेळाची इतकी आवड लागते की त्या खेळाच्या सर्व प्रकारात आपले कर्तृत्व सिद्ध करतो.तो मुलगा म्हणजे द कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी उर्फ माही*.      



    माही याने क्रिकेट खेळात दिलेल्या योगदानाबद्दल त्याला राजीव गांधी खेलरत्न,पदमश्री,पदमविभूषICCप्लेअर ऑफ द इयर,डॉक्टरेट यासारखे सन्मान मिळाले.कपिल देव नंतर इंडियन आर्मीचे सन्मानपद मिळवणारा खेळाडू म्हणजे माही.ICC टी ट्वेन्टी विश्वचषक 2007,एशिया चषक 2010,व 2016, ICC विश्वचषक 2011,चॅम्पियन ट्रॉफी 2013, या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धात माही ने कर्णधार म्हणून अभूतपूर्व यश मिळवले.IPL या देशांतर्गत स्पर्धेतही चार वेळा चषक जिंकत तो कर्णधार म्हणून यशस्वी झाला.         कर्णधार म्हणून तीनशे पेक्षा अधिक सामने खेळणारा माही जगातील एकमेव कर्णधार आहे.*


 *खेळाची आक्रमक शैली मैदानात प्रचंड संयम,सर्वोत्तम *फिनिशर, साहसी रोमांचक व्यक्तीमत्त्व यामुळे माही वेगळा खेळाडू ठरतो.क्रिकेटच्या कसोटी,एकदिवसीय,ट्वेन्टी या तीनही प्रकारात  साडेचारशे पेक्षा अधिक सामने खेळणारा माही अनके तरुणांचा आदर्श यासाठी आहे की कितीही यश मिळवले तरी आपले पाय कायम जमिनीवर हवे हे माहीने कृतीतून दाखवून दिले आहे.देवधर ट्रॉफी मधून भारतीय क्रिकेटला हा अनमोल हिरा मिळाला.बारावी नंतर शिक्षणाला रामराम करणाऱ्या माहीने काही दिवस रेल्वेत तिकीट चेकर म्हणूनही नोकरी केली.एम.एस.धोनी अनटोल्ड स्टोरी हा त्याच्या जीवनावर आलेला चित्रपट प्रचंड गाजला. एका छोट्या गावातून आलेला मुलगा क्रिकेट मध्ये येतो आणि इतके अफाट यश मिळवतो हे अजिबात सोपे नव्हते. त्यामागे होता त्याग,समर्पण,प्रचंड जिद्द,काय करायचे आहे याची पूर्ण माहिती,दृढ निश्चय, म्हणूनच माही इतरांपेक्षा वेगळा आणि यशस्वी ठरतो*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०