गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९६
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -96-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*त्याचा जन्म इटली देशातील फ्लोरेन्स शहरात झाला.लहानपणापासून अभ्यासू आणि चौकस असणाऱ्या त्याला चित्रकलेत विशेष गती होती.त्याचबरोबर गणित,विज्ञान, काव्य संगीत याही विषयांची त्याला आवड होती.वडिलांनी त्याला आंद्रे डेल वेराचीओ कडे शिकण्यासाठी ठेवले.येथे शिकताना तो अवघ्या विसाव्या वर्षी गिल्ड ऑफ आर्टिस्ट चा मास्टर होतो.तो मुलगा इतका कसलेला चित्रकार होतो की त्या काळात जो तैलरंगाचा वापर तो सहजतेने चित्रात करू लागतो.पुढे तो जगात अजरामर झालेल्या गूढ स्मितहास्य असणाऱ्या मोनालीसा या स्त्री चे पोर्टेट रंगवतो.तो महान चित्रकार म्हणजे म्हणजे लिओनार्डो दा व्हीन्सी **
मोनालीसा या चित्राचे वैशिष्ट्ये म्हणजे या स्त्रीचे स्मितहास्य कुठूनही पाहिले तरी तिचे डोळे आपल्याकडेच पाहतात असे वाटते. भले भले समीक्षक अजूनही या चित्राचा नेमका गूढ अर्थ काय हे पाच शतके उलटली तरी शोधत आहे.याचबरोबर मिलान मधील मारिया चर्च मध्ये येशू ख्रिस्त आपल्या बारा शिष्याबरोबर भोजन घेत आहे हे लिओनार्डो यांनी प्लास्टर वर तैलरंगात काढलेले चित्रही प्रचंड वाहवा मिळवून गेले.
*ग्लायडर,आकाशात उडणारे वाहन,हवेचे घटक,शरीराचे अवयव,वनस्पतींची वाढ,अशा अनेक विषयांचे लिओनार्डो यांना आकर्षण होते. या सर्वांची विशेष अशी माहिती त्यांनी संकलित केलेली होती.प्रबोधन काळातील उत्कृष्ट विचारवंत म्हणून आजही त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.संगीत आणि चित्रकलेवर लिओनार्डो यांनी हुकूमत गाजवली ती आपल्या प्रचंड मेहनतीने आत्मसात केलेल्या चित्रकला या कलेमुळे.त्यांचे जीवन मोनालीसा चित्रावरून जणू एकच संदेश देते की एकच काम असे काही मन लावून सर्वस्व झोकून देऊन करा की त्या कामातून इतिहास निर्माण झाला पाहिजे.आणि लोक सहज म्हटले पाहिजे असा माणूस पुन्हा होणे नाही*.

Comments
Post a Comment