गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८६
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -86-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*पाकिस्तान देशातील स्वात जिल्ह्यात मंगोरा येथे तिचा जन्म 12 जुलै 1997 मध्ये झाला. वडील झियाउद्दीन तर आई तोर पेकाई यांच्या पोटी ती जन्मली.ती ज्या भागात जन्मली होती तेथे मुलींनी शिक्षण घेणे हा जणू गुन्हा होता.जवळच असणारी तालिबानी राजवट तशी परवानगी देत नव्हती.पण ती मुलगी शिक्षण या मुद्यावर ठाम राहिली.याचा बदला म्हणून अतिरेकी तिला शाळेतच तीन गोळ्या घालतात. ती गंभीर जखमी होते,इंग्लंड मध्ये तिच्यावर उपचार होतात.यात ती बचावली जाते.जगभरातून या घटनेचा निषेध केला जातो.ती जीवन मरणाच्या संकटातून वाचल्यावर मुलींच्या शिक्षणासाठी जगभरात प्रसाराचे काम करणार असे घोषित करते.तिच्या या धाडसाचे जगभर कौतुक होते.पुढे ती मुलगी नोबेल पारितोषिक मिळवणारी जगातील सर्वात लहानमुलगी ठरते.ती प्रचंड धाडशी मुलगी म्हणजे मलाला युसुफझाई*.
सर्वात लहान वयात शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या मलाला यांना इतक्या लहान वयात इंटरनॅशनल चाईल्ड पीस अवार्ड, नॅशनल युथ पीस प्राईझ ऑफ पाकिस्तान,गॅलेंट अवार्ड, मदर टेरेस मेमोरियल अवार्ड, रोम प्राईझ,वूमन ऑफ द इयर,संयुक्त राष्ट्र संघाची कन्या यासारखे चाळीसहून अधिक सन्मान मिळाले आहेत.इतके सारे पुरस्कार मिळवणाऱ्या जगातील सर्वात कमी वयाच्या आहेत.त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वात तरुण शांतिदुत आहेत.
*दहशतवादी संघटनांना तीव्र विरोध करणाऱ्या मलाला यांनी पाकिस्तानातील भीषण चित्रण जगासमोर यावे म्हणून वर्तमानपत्रात गुलमकई नावाने डायरी लिहिली.येथील महिलांच्या मानवी हक्कांची पायमल्ली तिने जगासमोर आणली.मी भीतीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे असे म्हणणाऱ्या मलाला जेव्हा तुमचा आवाज गप्प केला जातो तेव्हाच आपल्या आवाजाची किंमत आपल्याला समजते हेही आवर्जून सांगतात. एक पुस्तक, एक लेखणी,एक बालक,आणि एक शिक्षक अवघे जग बदलू शकतो हे मलाला यांचे विचार वाचले की आपल्या अफाट निश्चयाच्या आड कुणीही आले तरी प्रचंड धैर्याने त्याचा सामना आपण करावा हिच शिकवण मिळते*.

Comments
Post a Comment