गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ८०

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -80-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                       



*महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे तिचा जन्म झाला.तिचे वडीलपाटबंधारे विभागात कार्यरत होते.ती शाळेत असताना अभ्यासापेक्षा इतर उपक्रमात अधिक सहभागी होत असे.यातूनच तिने एन. सी .सी.मध्ये प्रवेश घेतला.मग मात्र तिला वर्दीचे आकर्षण वाटू लागले.कुठलीही वर्दी आपल्या अंगावर हवी ही तिची जिद्द होती.यातूनच अग्निशामक अभियांत्रिकीची परीक्षा ती देते.अग्निशामक सेवा विद्यालयात फक्त 30 जागा असतात यात ती निवडली जाते.महिला आणि अग्निशमन विभागात अशा सर्वांच्या नजरा असतात कारण याआधी असे कधी घडले नव्हते.महिला असूनही कोणतीही सवलत न घेता ती मुलगी सात सेमिस्टर चा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करते.आणि ती मुलगी पुढे भारतातीलच नाही तर दक्षिण पूर्व आशियातील पहिली महिला अग्निशमन अधिकारी बनते.ती प्रचंड जिद्दी मुलगी म्हणजे फर्स्ट फायर वूमन हर्षिनी कान्हेकर*.                        


हर्षिनी यांनी पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या अग्निशमन विभागाला आपले करियर म्हणून निवडले.प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी कोलकत्ता व दिल्ली येथे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.पुरुषांमध्ये हर्षिनी या एकमेव मुलगी असल्यामुळे त्यांना आपोआप प्रसिद्धी मिळाली.पण त्याचा कुठेही गाजावाजा त्यांनी केला नाही.आपले काम निष्ठेने करत राहिल्या. मुंबई येथे ONG विभागात अग्निशमन अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अचानक लागलेल्या आगीशी सामना कसा करावा याबाबत मोठी जागृती केली.                       


*हर्षिनी यांच्या कार्याचा भारत सरकारने पहिल्या अग्निशमन अधिकारी म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केला आहे. तसेच नीती आयोग व संयुक्त राष्ट्र यांच्यातर्फे 'ट्रान्सफार्मिंग वूमन ऑफ इंडिया 'हा सन्मान देण्यात आला आहे.हर्षिनी या क्षेत्रात आल्या तेव्हा ही कोण कुठली?आमच्या क्षेत्रात तुमचे काय काम?असे प्रश्न नजरेच्या मागे दडले होते.पण हर्षिनी यांचा दृढ निश्चय त्यांना इथपर्यंत घेऊन आला आणि प्रचंड यश देऊन गेला.त्यांचे आयुष्य हाच संदेश देते की स्त्री ही अतुलनीय धैर्याचे प्रतीक आहे,तिची जिद्द भली भली संकटे सहज परतवून लावते. तिने मनात आणले तर ती पुरुष वर्चस्व असणारे कोणतेही बुरुंज तोडण्यात यशस्वी होते*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०