गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७३
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -73-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248 *इटली देशातील पिसा टस्कनी येथे त्याचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 मध्ये झाला.वडील व्हिसेन्झो हे संगीतकार व लोकरीचे व्यावसायिक तर आई गिउलिया ही गृहिणी.परिस्थिती कठीण असूनही वडिलांना आपल्या मुलाने डॉक्टर बनावे असे वाटत असे पण त्याचे मन गणितात अधिक रमत असे.मनात इच्छा नसूनही तो पिसा विद्यापीठात विज्ञान शाखेत प्रवेश घेतो. तेथे परिस्थितीने शिक्षण अर्धवट सुटते.काही काळ शिकवण्या घेऊन तो उदरनिर्वाह करतो.पुढे पिसा विद्यापीठातच गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरीला लागतो.मग मात्र तो।मागे वळून पहात नाही.आपल्या अफाट ज्ञानाच्या बळावर तो अनेक शोध लावतो आणि जगातील पहिला आधुनिक शास्त्रज्ञ बनतो. दुर्बिणीचा अनोखा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली*.
लंब
काचे दोलन दोरीच्या लांबीवर अवलंबून असते,घन पदार्थाला गुरुत्व असते,भिन्न वस्तूंचा पडण्याचा वेग सारखाच असतो,चंद्र हा गुळगुळीत नसून त्यावर डोंगर दऱ्या आहेत व तो सूर्य प्रकाशाच्या परावर्तनाने प्रकाशतो,गुरूला चार मोठे तेजस्वी उपग्रह आहेत,शनी लंबगोल आहे,पदार्थाचा गती संबंधी नियम, हे सारे सिद्धांत मांडून त्यांनी प्रयोग करून सिद्ध करून दाखवले.वस्तूचे द्रवातील वजन करण्याचा वजनकाटा,अल्कोहोल चा तापमापक,अरेखनचा कंपास,हे सारे लोकोपयोगी शोध गॅलिलिओ यांनीच लावले.आपले शोध प्रयोगाने सिद्ध करून दाखवण्याचा पायंडा त्यांनी पाडला म्हणूनच गॅलिलिओ यांचा आधुनिक शास्त्रज्ञ म्हणून गौरव केला जातो.
*सूर्य पृथ्वी भोवती फिरतो या आधीच्या कल्पनेला गॅलिलिओ यांनी पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे मत मांडून छेद दिला.यावरून रोमच्या न्यायालयात धर्म पाखंडी म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला.यात त्यांना हे वाक्य मागे घ्यायला लावून शिक्षाही केली.पण त्यांचे पृथ्वी सुर्यभोवती फिरते हे विधान सत्य होते हे जगाला नंतर मान्यच करावे लागले.वस्तूची 32 पट प्रतिमा दिसेल इतकी मोठी दुर्बीण तयार करून अवघे आकाश मुठीत आणणाऱ्या गॅलिलिओ यांना ते जादूटोणा करतात म्हणूनही हिणवले गेले,पण ते थांबले नाही.लोक धर्म द्रोही म्हणत इतक्या अडचणीतून त्यांनी इतके शोध लावले.त्यांच्या आयुष्यातून आपण एकच शिकायचे तुम्हाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जे आवडते त्या क्षेत्रात तुमचे कार्य नेटाने करत रहा.त्या कामात सातत्य असेल तर आपली दखल घेतली जातेच जाते*.

Comments
Post a Comment