गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ७०

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -70-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248     


               

   *इंग्लंड देशातील न्यूइंग्टन सरी येथे त्याचा जन्म 22 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.लोहराचे काम करणारे वडील जेम्स यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे त्याला शिक्षण मिळणे तसे दुरापास्तच होते.वयाच्या 14 व्या वर्षी प्राथमिक वाचन लेखन तो कसेबसे शिकला. कधी कधी फक्त ब्रेड खाऊन दिवस काढावे लागत असे.इतक्या लहान वयात तो एका प्रेस मध्ये पुस्तके बायडिंग करण्याच्या नोकरीला लागला. तेथे दिवसभर काम करून तो रात्री पुस्तके वाचत असे.येथेच अनेक विज्ञान पुस्तके त्याच्या वाचनात आली. पुढे त्याला हॅप्रि  डेव्हि हे शास्त्रज्ञ गुरू मिळाले.रॉयल सोसायटी कॉलेज मध्ये त्याचे शिक्षण पुनश्च हरिओम म्हणत सुरू झाले.मग त्याने विजेच्या संदर्भात असे काही शोध लावले की त्याला विजेच्या शोधाचे 'पितामह 'म्हटले जाते.तो मुलगा म्हणजे महान शास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे*.               


मायकेल यांनी मोटार,इलेक्ट्रिकल जनरेटर, बेझॉल रसायनाचा शोध,कार्बन क्लोरीन संयुगे,हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोजन सल्फाईड,कार्बन डाय ऑक्साईड यांचे द्रवीकरण यासारखे अनेक शोध लावले.एखादी विद्युत प्रवाह वाहून नेणारी वायर जी चुंबकीय बलाच्या मदतीने विद्युतीय बलाची निर्मिती एका मॅकॅनिकल बलात करते याच तत्वातून मायकल यांनी मोटारचा शोध लावला.आणि आपल्या दैनंदिन वापरातील फॅन,मिक्सर,पाणी पंप, कार अशा कोट्या


वधी वस्तूत मोटार वापरली जाऊ लागली.ही क्रांती अवघ्या जगात उलथापालथ करणारी ठरली.मायकेल यांचे विद्युत चलीत्राचे तत्व वापरून आज जगभरात वीज निर्माण केली जाते.  

                                      

*100 पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेल्या मायकेल' यांना रॉयल सोसायटी 'चे फेलो म्हणून सन्मान मिळाला.संशोधन क्षेत्रातील अत्यंत मानाची रॉयल,रमफर्ड,कॉप्लि ही पदके त्यांना मिळाली.'नॅचरल फिलॉसॉफर' ऐवजी 'सायंटिस्ट' हा शब्द त्यांनी शोधून काढला.शेक्सपिअर,न्यूटन,यानंतर इंग्लंड मधील 20 पौंड नोटेवर फोटो असणारे एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे मायकेल फॅरेडे.कोठेही उच्च शिक्षण न घेतलेल्या,घरी प्रचंड गरिबी असलेल्या मायकेल यांनी इतके महत्वाचे शोध लावले ते त्यांच्याकडे असलेल्या चिकाटीमुळे.आपलेही आयुष्य असेच आहे आपल्या मनाला फक्त  एकच सांगायचे तुला एका निश्चित ठिकाणी जाऊन थांबायचे आहे.मगच विसावा घ्यायचा आहे तोपर्यंत प्रयत्न करणे सोडायचे नाही*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०