गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग - १०
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-10* *📝*श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे* 8308677799 8806150248 *आसाम राज्यातील गोलघाट मधील बाडा मुखींया हे तीचे गाव.2 ऑक्टोबर 1997 साली आई मॅमोनी यांच्या पोटी तिचा जन्म झाला.तीचे वडील टिकेन लघुउद्योजक. ती शाळेत असताना पदुम बोरो यांनी तिच्यातील गुणवत्ता हेरली आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.तीने प्रथम किक बॉक्सर म्हणून कारकिर्दीस सुरवात केली .संधी मिळताच मुष्टियुद्धाकडे वळली .पुढे तीचे प्रशिक्षक होते शिव सिंह.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती कसेलेली खेळाडू बनली. जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलम्पिक स्पर्धेत 69 किलो वजनी गटात टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये भारताला पाहिले ब्राँझ पदक जिंकून देण्याचा अचाट पराक्रम तीने केला.असे यश मिळवणारी ती मुलगी म्हणजे लवलीना बोरगोहेन.* लवलीना ने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धा कांस्यपदक, आशियाई स्पर्धा कांस्य पदक,आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, मिळवले आहे. तिच्या याच कार्याची दखल घेत तिला अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.ऑलम्पिक मध्ये पात्र ठरणारी ...