Posts

Showing posts from November, 2021

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १००

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -100-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                           *मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म  24 एप्रिल 1973 साली झाला.त्याचे वडील प्राध्यापक होते.लहानपणापासून त्याला क्रिकेट ची प्रचंड आवड होती आणि गतीही होती.शारदाश्रम शाळेत असताना त्याचे क्रिकेट बहरले.शाळेत असताना त्याचा मित्र विनोद कांबळी आणि त्याने हॅरिष शिल्ड ट्रॉफी मध्ये 664 धावांची अभेद्य भागीदारी केली.पुढे रमाकांत आचरेकर गुरू म्हणून त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला क्रिकेट चे बारकावे अधिक समजले.तो क्रिकेट मध्ये इतका पारंगत झाला की तो क्रिकेट मधील भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडू झाला.तो जेव्हा खेळत असे तेव्हा लोक त्याला क्रिकेटचा चमत्कार म्हणत असे.तो मुलगा म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर*.                      ...

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९९

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग -99-* *📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*     8308677799     8806150248                        *त्याचा जन्म इंग्लंड मधील वायलम या गावात 9 जून 1781मध्ये झाला.त्याचे वडील कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून काम करत होते.तो वडिलांबरोबर हे कामही करत असे आणि रात्रीचा अभ्यासही.त्याकाळी इंग्लंड मध्ये दगडी कोळशाचा प्रचंड साठा होता.तेथील सर्व कारखाने,उद्योगधंदे हे दगडी कोळशाच्या ऊर्जेवर चालत असे.हा साठा कारखान्यात पोहचवणे खुप जिकरीचे,वेळ खाऊ,मजूर टंचाईचे काम होते.याच गरजेतून त्याला कोळसा वाहण्यासाठी यंत्र बनवण्याची कल्पना सुचली आणि त्याने खाणीतील कोळसा ने आण करण्यासाठी ब्लचर नावाचे एक वाफेचे इंजिन बनवले.हे इंजिन कोळशाची ने आण करू लागले.यामुळे वेळ,पैसे, श्रम यांची बचत होऊ लागली.पुढे याच इंजिनाच्या तंत्राचा आधार घेत त्या मुलाने आगगाडी साठी वाफेचे पाहिले इंजिन बनवले.साऱ्या जगाला आगगाडीच्या चाकांनी गतिशील करणारा तो मुलगा म्हणजे जॉर...