गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १००
*📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
*📝*भाग -100-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*
8308677799
8806150248
*मुंबई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म 24 एप्रिल 1973 साली झाला.त्याचे वडील प्राध्यापक होते.लहानपणापासून त्याला क्रिकेट ची प्रचंड आवड होती आणि गतीही होती.शारदाश्रम शाळेत असताना त्याचे क्रिकेट बहरले.शाळेत असताना त्याचा मित्र विनोद कांबळी आणि त्याने हॅरिष शिल्ड ट्रॉफी मध्ये 664 धावांची अभेद्य भागीदारी केली.पुढे रमाकांत आचरेकर गुरू म्हणून त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला क्रिकेट चे बारकावे अधिक समजले.तो क्रिकेट मध्ये इतका पारंगत झाला की तो क्रिकेट मधील भारतातीलच नाही तर जगातील सर्वोत्तम खेळाडू झाला.तो जेव्हा खेळत असे तेव्हा लोक त्याला क्रिकेटचा चमत्कार म्हणत असे.तो मुलगा म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर*.
फलंदाजीचे कौशल्य,चिकाटी,खेळताना वापरलेले तंत्र, सातत्य,प्रचंड आत्मविश्वास यामुळे सचिन कसोटी,एकदिवसीय, ट्वेन्टी सामन्यात प्रचंड यशस्वी झाला.आंतरराष्ट्रीय सामन्यात कसोटी व एकदिवसीय सामन्यात शतकांचे शतक करणारा जगातील एकमेव खेळाडू म्हणजे सचिन.आक्रमकता,भक्कम बचाव,गोलंदाजाचे तंत्र हाणून पाडणे,प्रचंड बुद्धिमान यामुळे सचिनची कामगिरी चमकदार होत गेली.त्याच्या क्रिकेट मधील योगदानाची दखल घेत त्याला अर्जुन,महाराष्ट्र भूषण,पदमविभूषण,राजीव गांधी खेलरत्न, भारतरत्न.वायुसेना दलाकडून ग्रुप कॅप्टन,म्हैसूर व राजीव गांधी विद्यापीठा कडून मानद डॉक्टरेट, क्रिकेट ऑफ द इअर,ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया असे असंख्य मान सन्मान मिळाले.
*कसोटी व एकदिवसीय 664 सामन्यात 34 हजार पेक्षा अधिक धावा करणारा सचिन 89 वेगवेगळ्या मैदानावर खेळलेला पहिला खेळाडू आहे.50 पेक्षा अधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू सचिन.वयाच्या अकराव्या वर्षांपासून क्रिकेट खेळणाऱ्या सचिनने तमाम लाखो भारतीयांना आनंदाचे क्षण दिले.तो मैदानात आल्यावर सचिन$$सचिन$$ याचा जयघोष आजही कानात घुमतो हेच सचिनच्या लोकप्रियतेचे गमक आहे.सचिन आज क्रिकेट मधून निवृत्त झालेला असला तरी 'अपणालय 'या स्वयंसेवी संस्थेतील 200 मुलांचे पालन पोषण कुठलाही गाजावाजा न करता दरवर्षी करत आहे.सचिन क्रिकेट मध्ये इतका यशस्वी झाला पण अहंकाराचा स्पर्श त्याला कधी झाला नाही.त्याने विक्रमांचा अक्षरशः हिमालय उभा केला पण 'मी 'पणा त्याला शिवला नाही यावरून आपण हेच शिकायचे की कोणत्याही क्षेत्रात कितीही मोठे व्हा पण जेथून मोठे झालो ती माती,ती माणसे,यांच्यापुढे त्या मोठेपणाला कधीच मीपणाचा वारा लागू देऊ नका.कारण तीच माणसे तुम्हाला एक दिवस डोक्यावर घेऊन मिरवणारी असतील*. *गोष्टी जिद्दी माणसांच्या या कथामालेचे सलग 100भाग आज पूर्ण झाले.सध्या इथेच थांबुया. पुन्हा लवकरच भेटूया नवीन कल्पना व नवी विषय घेऊन. धन्यवाद*🙏🏻🙏🏻

Comments
Post a Comment