गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ९९

 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -99-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248                        *त्याचा जन्म इंग्लंड मधील वायलम या गावात 9 जून 1781मध्ये झाला.त्याचे वडील कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून काम करत होते.तो वडिलांबरोबर हे कामही करत असे आणि रात्रीचा अभ्यासही.त्याकाळी इंग्लंड मध्ये दगडी कोळशाचा प्रचंड साठा होता.तेथील सर्व कारखाने,उद्योगधंदे हे दगडी कोळशाच्या ऊर्जेवर चालत असे.हा साठा कारखान्यात पोहचवणे खुप जिकरीचे,वेळ खाऊ,मजूर टंचाईचे काम होते.याच गरजेतून त्याला कोळसा वाहण्यासाठी यंत्र बनवण्याची कल्पना सुचली आणि त्याने खाणीतील कोळसा ने आण करण्यासाठी ब्लचर नावाचे एक वाफेचे इंजिन बनवले.हे इंजिन कोळशाची ने आण करू लागले.यामुळे वेळ,पैसे, श्रम यांची बचत होऊ लागली.पुढे याच इंजिनाच्या तंत्राचा आधार घेत त्या मुलाने आगगाडी साठी वाफेचे पाहिले इंजिन बनवले.साऱ्या जगाला आगगाडीच्या चाकांनी गतिशील करणारा तो मुलगा म्हणजे जॉर्ज स्टीफन्सन*. 

          


 1881 मध्ये लिव्हरपूल अँड मँचेस्टर रेलरोड कंपनीने प्रवाशी वाहतूकीसाठी इंजिन बनवण्याची स्पर्धा घेतली.यात जॉर्ज यांच्या इंजिनाने स्वतःच्या तिप्पट वजनाच ओझं ताशी वीस किलोमीटर व प्रवाशी भरलेला डबा एकोणचाळीस किलोमीटर वेगाने घेऊन जात प्रथम क्रमांक पटकावला.त्यांचे हे इंजिन टॉकेट इंजिन म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी अन्य मजुरांना बरोबर घेऊन रेल्वे इंजिन तयार करून लिव्हरपूल ते मँचेस्टर अशी रेल्वे चालवली.       आता दळणवळण साधने मोठ्या प्रमाणात वाढली आहे.आज जगात सगळीकडे आगगाड्यांचे जाळे पसरले आहे.आज विजेवर चालणाऱ्या रेल्वेचे पाहिले चाक वाफेवरील इंजिनामुळे पुढे गेले.याचे सारे श्रेय जाते ते जॉर्ज यांच्या कल्पक बुद्धीला. 


*त्यांच्या मूलभूत वाफेच्या इंजिनाच्या शोधाने माणसाचा प्रवास सुखकर तर झालाच.शिवाय मालवाहतुकीला गती मिळाली.जणू काही जगाची प्रगती कितीतरी पावले पुढे गेली.म्हणून जॉर्ज यांच्या शोधाचे मूल्य अमूल्य ठरते.जॉर्ज यांचे वडील कोळशाच्या खाणीत जरी कामाला असले तरी त्या गोष्टीचा त्यांच्यावर,त्यांच्या कल्पकतेवर,कुठलाही परिणाम झाला नाही.यातून हेच शिकायचे परिस्थिती कशीही असली तरी संकटरुपी वादळाला टक्कर देण्याची हिम्मत आपण ठेवायला हवी*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्ट माझ्या आईची भाग-२०

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०८