गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०८


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -108-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म सायलेशिया प्रांतात हेनझनडॉर्फ खेड्यात 12 जुलै 1822 मध्ये झाला.त्याला लहानपणापासून निसर्गाची आवड होती.निसर्ग विविध वाटांनी त्याला खुणावत असे.माध्यमिक शिक्षणासाठी तो ट्रोपाऊ येथे जातो घरातील भरपूर गरिबीमुळे फिपुरते पैसे मिळावे म्हणून सुट्टीत नोकरी करतो.झाड तोडताना वडिलांचा अपघात होतो.पैसे येण्याचे मार्ग बंद होतात.आहे तीही जमीन विकावी लागते.कसेबसे तो आपले शिक्षण पूर्ण करतो.पुढे तो मुलगा वाटाण्याच्या पिकावर असंख्य प्रयोग करून सजीवांच्या अनुवंशिकतेची वैज्ञानिक उत्पत्ती हा सिद्धांत मांडतो.यातून तो हे सिद्ध करतो की एका पिढीची जनुके दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात.हे संशोधन करणारा तो मुलगा म्हणजे ग्रेगोर योहान मेंडेल*.


*प्रयोगासाठी वाटाणे निवडण्याचे कारण म्हणजे वाटाणे  लवकर वाढतात,त्यांचे प्रजनन सोपे,त्यात विविध गुणधर्म असतात.संकरण प्रयोग करताना त्यांनी वाटाण्याच्या वनस्पतीचे विरुद्ध परागीकरण केले.जेणेकरून पुढील पिढ्यांमध्ये मागील गुण कसे वारशाने मिळतात यावर महत्वाचे शोध मेंडेल यांनी लावले.मागील पिढीतील रंग,रूप,उंची,प्रजनन क्षमता,यावर केलेले त्यांचे संशोधन मोलाचे ठरते.उंचा विरुद्ध खुजा,लहान विरुद्ध मोठा ही लक्षणे पुढच्या पिढीत उतरतात.अनेक गुण माता पित्याकडून मुलांना मिळालेले असतात हा नियम त्यांनी मांडला.या नियमांनाच मेंडेल नियम म्हणतात*.


*आज विविध ठिकाणी DNA जुळवले जातात.हे मेंडेल यांच्या प्रयोगाचे फलित आहे.कृषी,फलसंवर्धन, द्राक्षवेलींची लागवड याचा त्यांनी अभ्यास केला.भाषा,गणित या विषयाचे ते प्राध्यापक होते.त्यांनी आपले संशोधन प्रभावी व्हावे यासाठी नॅचरल सायन्स सोसायटीची स्थापना केली.त्यांनी केलेल्या संशोधनाकडे त्यांच्या मृत्यूनंतर  सहा वर्षांनी इतर शास्त्रज्ञाचे लक्ष गेले.तोपर्यंत हा निसर्ग सेवक,जगातील महान शास्त्रज्ञ निसर्गाच्या अधीन होवून हे जग सोडून गेला होता.मेंडेल आयुष्यभर असे जगले की घेण्यापेक्षा देत गेले.या महान शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत कीर्ती उपभोगता आली नाही.पण त्यांचे आयुष्य आपल्याला हिच शिकवण देते की आयुष्यभर असे काम करा की तुमच्या जाण्याने इतरांना काही काळ का होईना हळहळ वाटली पाहिजे.तुमच्या नंतर ही तुमच्या वेगळ्या गुणांचा,कार्याचा दरवळ मागील पिढीच्या मनात राहिला पाहिजे*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०