गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११८
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*
*पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -18-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म दक्षिण कोरिया या देशात स्तुसेन येथे 25 नोव्हेंबर 1915 मध्ये झाला.आई वडील दोघेही शेतकरी. घरात सात भावंडे.घरातील परिस्थिती प्रचंड गरिबीची.शिकायची इच्छा असूनही शाळा शिकता येत नाही.तो लाकूड तोडून ती विकायला शहरात जात असे.त्या शहराचे त्याला प्रचंड आकर्षण वाटे.आपणही येथे एक दिवस यावे पोटभर अन्न मिळेल हीच त्याची माफक अपेक्षा.गुरे सांभाळणे,शेतात राबणे,ही कामे करताना जगावेगळे काहीतरी आपण करावे असे त्याला वाटत.मग तो मनाचा निश्चय करतो आणि घर सोडतो,शहरात येतो.बांधकाम मजूर म्हणून काम करतो.पुढे काही दिवस तो मुलगा तांदूळ व्यापारीही होतो कन्स्ट्रक्शनचाही व्यवसाय करतो यात त्याचा चांगला जम बसतो.पुढे तो एक गॅरेज टाकतो.यातून पुढे तो इतकी प्रगती करतो की जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कर कंपनीचा संस्थापक बनतो.हे स्वप्नवत यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे चुंग जू युंग आणि ती कार कंपनी म्हणजे ह्युंदाई*.
*ह्युंदाई इंजिनीरिंग अँड कन्स्ट्रक्शन पासून सुरु झालेला चुंग जू युंग यांचा प्रवास पंचाहत्तर हजारपेक्षा अधिक काम करणारे कामगारांची कंपनी आणि1.6 बिलियन डॉलर्सची कंपनी पर्यंत आला.क्रेटा, वेन्यू,i20 यासारख्या प्रचंड खपाच्या कार कंपनीने तयार करताना.शिपिंग उद्योगातही भरारी घेतली आहे.Cortina नावाची पहिली कार कंपनीने बनवली तेव्हा प्रचंड तोटा झाला.लोकांनी अगदी कारचे पैसे परत मागितले.पण चुंग खचले नाहीत त्याच नावाची कार बदल करून परत बाजारात आणून विक्रमी विक्री करून दाखवली.200 पेक्षा अधिक देशात आपल्या कार विकल्या जातील असे चुंग कुणाला म्हटले असते तर त्यांना वेडे ठरवले असते पण त्यांनी ते करून दाखवले*.
*वडिलांची एक गाय विकून शहरात आलेले चुंग यांनी 1001 गायीचे संगोपन केले.याचे कारण विचारल्यावर ते सांगत त्या एका गाईच्या उपकाराची मला एक हजार पट परतफेड करायची होती.आपली स्वतःची वेगळी काही वेगळी ओळख असावी म्हणून चुंग यांनी चार वेळा घर सोडले.कर्ज काढून सुरु केलेले गॅरेज जपान सरकारने ताब्यात घेतले तरीही ते खचले नाही.त्यावेळी त्यात 70 कामगार काम करत होते.1967, साली उभारलेली कंपनीचे उत्पादन विभागाचे गोडवून 1969 साली पुरात वाहून गेले तरी ते डगमगले नाहीत.पैसे कमी,घरची गरिबी,डिलिव्हरी बॉय,तांदूळ विक्रेता,बांधकाम मजूर,हे सारे करताना चुंग थांबले नाहीत त्यांचे आयुष्य आपल्याला जगण्याचा नवा वस्तुपाठ घालून देते.आणि आपल्याला हाच संदेश देते की कधी कधी तुमच्या कल्पनांना नाकारले जाणे सुद्धा महत्वाचे असते.त्या नकाराचा उपयोग एका नव्या प्रेरणेचा जन्म देतो मग त्यातूनच तुमच्या हातून असे काही अदभुत घडते की यशाच्या न पाहिलेल्या शिखरावर तुम्ही असता.कधीही न मागे येण्यासाठी*.

Comments
Post a Comment