गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग 123


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -23*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याच्या जन्म मध्यप्रदेश मधील खंडवा या शहरात 4ऑगस्ट 1919 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्याची आई गौरीदेवी गृहिणी तर वडील कुंजलाल गांगुली हे वकिल होते.लहानापासून त्याच्या स्वभाव विनोदी,व्रात्य,खोडकर होता.इतरांची हुबेहूब नक्कल करणे हे त्याला सहज जमायचे.त्याचा मोठा भाऊ अशोककुमार प्रसिद्ध अभिनेता होता.त्याला वाटायचे की याने अभिनेता व्हावे पण त्याला गायन करायला प्रचंड आवडायचे.मनात नसतानाही तो काही चित्रपटात अभिनय करतो.पण त्याचा मूळ पिंड गाण्याचा असतो.पुढे तो मुलगा इतका प्रसिद्ध गायक होतो की आपल्या गाण्याने करोडो लोकांना वेड लावतो.त्याचा आवाज लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.त्याची गाणी हजारो भारतीयांच्या मनावर मोहिनी घालतात.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध गायक अभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार*.


*किशोर कुमार यांनी भारतीय चित्रपट सृष्ठीसाठी सुमारे 2700 पेक्षा अधिक गाणी गायली.हिंदी,बंगाली,असामी,कन्नड यासारख्या नऊ भाषांत गाणे गाण्याची अदभुत कला त्यांच्याकडे  होती.चलती का नाम गाडी,पडोसन, नई दिल्ली,आशा,हाफ टिकट यासारख्या 81 पेक्षा अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.राजेश खन्ना पासून ते आताच्या गोविंदा पर्यंतच्या सर्व समकालीन अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली.मेरा नाम अब्दुल रहमान,नखरे वाली,इना मीना डिका, हमे तो मोहब्बत है.ही त्यांची काही गाजलेली गाणी.किशोर कुमार यांना त्यांच्या कारकीर्दीत आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. मध्य प्रदेश सरकारकडून त्यांची आठवण म्हणून त्यांच्या नावाचा पुरस्कार दरवर्षी दिला जातो*.


*किशोर कुमार यांना देवाने चांगला गळा दिला होता.त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही संगीताचे शिक्षण घेतले नाही.आवड आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर त्यांनी आपल्या नावाचे एक पण इतिहासात राखून ठेवले.सुरवातीला अनेक वेळा अपयश येवूनही ते शांतपणे संधीची प्रतीक्षा करत राहिले.संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांनी किशोर कुमार यांच्यातील गायक हेरला आणि किशोर कुमार घडले.किशोर कुमार यांचे आयुष्य आपल्याला हाच बोध देते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सचिन देव बर्मन असतात जे आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन देतात आणि आपले सारे आयुष्य बदलवून टाकतात.आपल्या यशाचे साक्षीदार होतात.आपल्या कायम सोबत राहून ते आपल्या विजयाचा उत्सव साजरा करतात*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०