गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११९


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -19-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याच्या जन्म गुजरात राज्यातील नवसारी तालुक्यातील गणदेवी येथे 26 मे1885 रोजी होतो. सौराष्ट्र मधील जामनगर येथे शिक्षण घेत असताना त्याच्या वडिलांचे निधन होते.मग महाराष्ट्रात तो शिक्षणासाठी येतो.वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी तो मुलगा मित्रप्रिती हे नाटक लिहितो.मॅट्रिक पास झाल्यावर पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्रवेश घेतो.पण त्याला नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नाही.तो किर्लोस्कर नाटक कंपनीत डोअर किपर म्हणून रुजू होतो.पुढे तो मुलगा नाट्य क्षेत्रात  इतका मोठा होतो की त्याचे नाव कानावर पडले तरी मराठी माणसाचा उर भरून येतो.हे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज*.


*गडकरी यांचा नाटककार कोल्हटकर यांच्याशी परिचय झाला आणि त्यांच्या लेखणीचा व विनोदाचा प्रभाव त्यांच्यावर पडला.विदर्भातील बाळापूर येथे शिक्षक म्हणून नोकरी करताना गर्व निर्वाण हे नाटक त्यांनी लिहिले.रंगभूमी साठी ते सवाई नाटकी या टोपण नावाने लेखन करत असे.प्रेमसंन्यास,तोड ही माळ ही नाटके लिहून त्यांनी नाटककार म्हणून आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर रंगभूमीवर त्यांची एकापाठोपाठ अनेक नाटके आली आणि गडकरी यांची यशाची कमान उंचावत गेली.त्यापैकी एकच प्याला, पुण्यप्रभा,भावबंधन,राजसंन्यास इ नाटके होती*.


*भाषावैभव,कल्पनाशक्ती,अलौकिक काव्यात्मकता,भावना उत्कटता ही त्यांच्या नाटकाची वेगळी अशी वैशिष्ट्ये होती.आपल्या नाटकातून सुख दुःखाची गुंफण करत कधी ते प्रेक्षकांना रडवत  तर कधी खळखळून हसवत.त्यात भूमिकेशी समरस होवून पात्र अगदी  मंचावर येत.सुधाकर,सिंधू ,तळीराम,गोकुळ,वृंदावन,कालिंदी,सुदामा,घनश्याम, लतिका ही पात्रे नाट्य क्षेत्रात अजरामर झाली.गडकरी यांनी कविता लेखन करताना गोविंदाग्रज या  नावाने केले.त्यांनी केलेले परंतु न प्रकाशित झालेले साहित्य अप्रकाशित गडकरी  नावाने प्रसिद्ध आहे.गडकरी यांच्या जीवनाचा मागोवा घेताना हाच बोध मिळतो की तुमची आवडच तुमची ओळख बनवावी.त्या आवडीत असे काही काम करावे की त्यावरूनच लोकांनी तुम्हाला ओळखावे*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०