गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१२
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -12-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*अमेरिका देशात 4 ऑगस्ट 1961 रोजी व्होनोलुल हवाई येथे त्याचा जन्म,वडील बराक ज्युनियर व आई एस.एन.डनहॅम यांच्या पोटी झाला. तो दहा वर्षांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट होतो.आजी आजोबा त्याचा सांभाळ करतात.आई बाबा त्याला भेटायला येत असे पण ती भेट दुर्मिळच.त्याचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया देशातील जकार्ता येथे होते.मग तो व्होनोलुल हवाई येथे येतो.कोलंबिया विद्यापीठात राजकरण शास्त्र,तर हार्वर्ड विद्यापीठात कायदा विभागात उच्च पदवी मिळवतो.पुढे तो मुलगा राजकारणात आपले नशीब अजमावतो.आपल्या अमोख वक्तृत्वाने लोकांच्या मनात घर करून बसतो.मग तो मागे वळून पाहत नाही.पुढे तो मुलगा जगातील सर्वात शक्तिशाली अमेरिका या देशाचा सलग आठ वर्ष पहिला आफ्रिकन कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनतो.तो मुलगा म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष,नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा*.
*सलग 12 वर्ष शिकागो विद्यापीठात संविधानशास्त्र शिकवणारे ओबामा अमेरिकेचे सेनेटरपद भूषविणारे पाचवे कृष्णवर्णीय सेनेटर होते.जागतिक शांतता वाढीसाठी अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल 2009 साली त्यांना नोबेल शांतता पारितोषिक देवून गौरविण्यात आले.याशिवाय ग्रॅमी पुरस्कार,ग्रॅमी अवॉर्ड यासारखे पुरस्कार त्यांना मिळाले.ते उत्तम साहित्यिक होते.ड्रीम ऑफ माय फादर,द ऑडा सिटी ऑफ होप ही त्यांची गाजलेली पुस्तके.प्रोजेक्ट व्होट या त्यांच्या गाजलेल्या मोहिमेमुळे कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन लोकांची मतदान यादीत नावे आली.कोणत्याही देशावर लष्करी कारवाई पूर्वी वाटाघाटी आवश्यक आहेत या मताचे ते होते*.
*आजी आजोबा यांच्या बरोबर एका छोट्या अपार्टमेंट मध्ये राहणारे ओबामा आपल्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असे.त्यांच्या भाषणाची तुलना मार्टिन ल्युथर किंग यांच्या बरोबर केली जाते.यामुळेच ते राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा सर्व घटकातील लाखो लोक वॉशिंग्टन येथे त्यांच्या शपथ विधीसाठी आले होते.कृष्णवर्णीय गरीब समाजाच्या मतदान हककासाठी,रोगनिवारण यासाठी त्यांनी खूप काम केले.सुरुवातीला शिक्षक,वकील,प्रकाशक,लेखक,सल्लगार,संपादक अशी कामे करणारे ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले ते प्रचंड सकारात्मक वृत्तीमुळे.त्यांचे संघर्षमय आयुष्य आपल्याला हेच सांगते की आव्हाने स्वीकारा,योद्धे कधीही पराजयाला घाबरत नाहीत.ते परिस्थितीचा छाताडावर पाय ठेवून उभे असतात जग जिंकण्यासाठी*.

Comments
Post a Comment