गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-122
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -22-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याच्या जन्म जमैका देशात शेरवुड येथे 21 ऑगस्ट1986 मध्ये आई जेनिफर तर वडील वेलस्ली यांच्या पोटी झाला.त्याला एक भाऊ,एक बहिण होते.वडिलांचा किराणा मालाचा व्यवसाय होता.शाळेत असताना त्याला क्रिकेट,फुटबॉल ची प्रचंड आवड होती.त्याला गोलंदाजी करायला खूप आवडायचे.शाळेत असताना त्याने धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला.त्याचे धावण्याचे अफलातून कौशल्य पाहून त्याचे शिक्षक तू चांगला धावू शकतो हा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण करतात.मग तो मुलगा वयाच्या बाराव्या वर्षापासून धावू लागतो.तो या खेळात प्रचंड कठोर मेहनत घेतो.या क्रीडा प्रकारात तो मुलगा इतका यशस्वी होतो की जगातील सर्वात वेगवान धावपटू बनतो.तो मुलगा म्हणजे युसेन सेंट लिओ बोल्ट तथा लाईटटिंग ब्लोट*.
*युसेन ब्लोट यांना पाब्लो मॅकमिलन नावाचे प्रशिक्षक मिळाले आणि त्यांचे आयुष्य बदलले. ब्लोट यांनी 100 मीटर धावण्याची स्पर्धा 9.58 या विक्रमी वेळेत पूर्ण करून जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून स्वतःला सिद्ध केले.8 वेळा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते,200 मीटर मध्ये चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन जिंकणारे,11 जागतिक पदके जिंकणारे बोल्ट,धावण्याच्या100 मीटर,200 मीटर,100×4 या तीनही प्रकारात सुवर्णपदक मिळवणारे एकमेव खेळाडू आहे.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत विश्विजेतेपद मिळवणारे बोल्ट हे खेळातील नम्रपणासाठी माध्यमात प्रचंड लोकप्रिय झाले.ते धर्मदाय संस्थांना,अनाथ मुलांना मदत करण्यासाठी खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर आपला वेळ देतात.यात मला आनंद मिळतो असे म्हणतात*.
*बोल्ट यांना वयाच्या सतराव्या वर्षी स्कोलियोशिस(मणका एका बाजुला झुकने, वक्र होणे)हा दुर्मिळ आजार झाला होता.आपण सगळे काही संपले म्हणून खचलो असतो ते खचले नाही पुन्हा नव्याने उभे राहिले जिंकण्यासाठी.शरीराच्या वेगवान वाढीमुळे त्यांच्या पाठीचा कणा वाकला होता या आजारावर त्यांनी मात केली.जीवनातील कितीतरी तास त्यांनी आपल्या खेळातील प्रेमासाठी घाम गाळला तेव्हा त्यांना हे यश मिळाले.प्रचंड सातत्य,आपल्या ध्येयावर लक्ष,त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी,मला जगात सर्वश्रेष्ठ धावपटू बनायचे आहे हा एकच ध्यास यातून बोल्ट एक दंतकथा बनून राहिले आहे.त्यांच्या जीवनातून आपण हेच शिकायचे तुमच्या जीवनातील प्रत्येक वेळ अनमोल आहे त्याचा उपयोग योग्य कारणासाठी करा.मग त्या मेहनतीतून मिळणारे तुमचे यश इतरांसाठी एक मार्ग असेल*.

Comments
Post a Comment