गोष्टी जिद्दी माणसांच्या-भाग, -117
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*
*पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -17-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याच्या जन्म सातारा जिल्ह्यात 16 नोव्हेंबर 1927 मध्ये आई सत्यभामा व वडील बाळकृष्ण यांच्या पोटी झाला.लहानपणापासून तो शीघ्र बुद्धिमान होता.याच बुद्धिमतेच्या जोरावर तो मुलगा एम. बी.बी.एस डॉक्टर होतो.आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करतो.पण त्याच्यातील शालेय जीवनापासून असणारी अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही.मग पुणे येथे पी. डी.ए या नाट्य संस्थेच्या माध्यमातून तो नाटकात काम करायला सुरुवात करतो.यातून तो मुलगा इतका कसदार नाटककार,अभिनेता बनतो की त्याच्या अनेक भूमिका अजरामर ठरतात.तो मुलगा म्हणजे एक चिंतलशील,विचारवंत अभिनेता श्रीराम लागू*.
*चित्रपटापेक्षा डॉ.लागू यांचे नाटकावर प्रेम होते.नाटक हे फक्त करमणुकीसाठी नाही तर ती एक गंभीर कला आहे.असे त्यांचे आग्रही मत होते.त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार तर इतर फ्लिमफेअर,कालिदास ,राजश्री शाहू गौरव,संगीत नाटक अकादमी श्रेष्ठ अभिनेता यासारखे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. वेड्याचे घर उन्हात, आधे अधुरे,गिधाडे,काचेचा चंद्र,हिमालयाची सावली,उद्ध्वस्त धर्मशाळा,सूर्य पाहिलेला माणूस या नाटकातील त्यांच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या.एक होती राणी हे नाटकही त्यांनी लिहिले होते.सामना सारखा मराठी चित्रपट करताना त्यांनी हिंदी चित्रपसृष्टीतही अनेक चित्रपटात काम केले.गुरू महाराज गुरू,एकच प्याला,शतखंड,धर्मशाळा,यासारख्या अनेक नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले*.
*डॉ.लागू अजरामर झाले ते नटसम्राट नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेने.त्या नाटकातील संवाद डॉ.लागू यांचा अभिनयामुळे लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे करण्यात यशस्वी झाले.पिंजरा चित्रपटातील त्यांची भूमिका संपूर्ण चित्रपट सृष्टीला उत्तम अभिनयाचा एक वस्तुपाठ घालून गेली.प्रामाणिक विचारांच्या डॉक्टर यांनी विचार स्वातंत्र्य जपत अंधश्रध्दा निर्मूलन साठीही परखड भूमिका घेत काम केले.डॉक्टर त्यांचे आयुष्य जगताना त्यांना आपला आनंद वैद्यकीय व्यवसायात नाही तर अभिनयातील आहे हे समजले.त्यात ते रमले नुसते रमलेच नाही तर आपल्या जीवनातील पाऊलखुणा मागे ठेवून गेले त्या कायमच्या.डॉ.लागू यांचे आयुष्य आपल्याला जणू हेच सांगते की स्वतःला प्रामाणिकपणे आवडणाऱ्या कामाचा आनंद घ्या.आपण कसे असायला हवे,तसे आपण आहोत का याचे स्वतःच निरीक्षण करा.त्यात सुधारणा करा मग जे असेल ते तुमचे असेल आणि सर्वोत्तम असेल*.

Comments
Post a Comment