गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०६
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या-पर्व -2 📝नवीन गोष्टी,नवीन व्यक्ती*
*📝भाग -6-*
*📝श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म रशिया मध्ये मॉस्को प्रांतातील रेझाना येथे 14सप्टेंबर 1849 मध्ये एका धर्मगुरूंच्या घरी झाला.घरात असणाऱ्या साध्या राहणीचा त्याच्यावर झालेला संस्कार त्याने आयुष्यभर जपला.त्याला लहानपणी विज्ञान विषयाची प्रचंड आवड होती. तो मुलगा तासनतास विज्ञान विषयाची विविध पुस्तके वाचीत असे.मोठेपणी जिवंत प्राण्यांवर प्रयोग करण्याचे तो मनोमन ठरवतो त्यासाठी रशियन प्रायोगिक वैद्यविद्या नावाची संस्था सुरू करतो.तो मुलगा पुढे प्राण्यांवर प्रयोग करून हा शोध लावतो की अनेक प्रकारच्या रासायनिक क्रिया पचनास मदत करतात,या विविध पाचक रसांचे आपण घेतलेल्या अन्नावर परिणाम होवून पचन क्रियेस मदत होतो.हा शोध लावणारा तो मुलगा म्हणजे इव्हन पेट्रोव्हीच पाव्हलॉव्ह*.
*पाव्हलॉव्ह यांनी या केलेल्या संशोधनाबद्दल त्यांचा नोबेल पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला.रॉयल सोसायटीचे काल्पि सुवर्णपदकही त्यांना मिळाले.शरीरक्रिया विज्ञानाचे व्याख्याते,औषध विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले.त्यांनी कुत्र्यांवर अनेक प्रयोग केले.सुरुवातीला प्रयोग करताना पुरेसे पैसे नव्हते मग बेवारस कुत्री गोळा करून त्यावर प्रयोग केले.त्यांची देखभाल ही केली.कुत्र्यांचे ऑपरेशन करून निरनिराळ्या पाचक रसांचा ते अभ्यास करत,निरीक्षण करत,टिपण काढत.प्राण्यांच्या घशातून पाचक रसांचे नमुने मोठ्या युक्तीने ते गोळा करत असे.कुत्र्याच्या जवळ भाकर घेवून गेले तर त्याची लाळ गळू लागते भाकर लांब गेली तर लाळ निर्मिती बंद होते हा त्यांचा सापेक्ष निरपेक्ष प्रयोग त्या काळात सर्वांनी मान्य केला*.
*पाव्हलॉव्ह यांनी हृदयविकार व प्रत्येक व्यक्तीचा रक्तदाब वेगळा असतो हे मोलाचे संशोधन केले.त्यांना अभ्यास करताना मानवी चित्त भ्रमाचे रोगी दिसले यातून त्यांनी प्राणी आणि माणूस काही ठिकाणी सारखा विचार करतात हे पटवून देण्यासाठी प्रयोगजनित मज्जाविकृती हा सिद्धांत मांडला.पाव्हलॉव्ह हे त्यांच्या आयुष्यात शेवट पर्यंत प्रयोग करत राहिले.त्यांचे जीवन आपल्याला हेच सांगते तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीत आनंद वाटतो,जी गोष्ट तुम्हाला मनापासून करायला आवडते ती गोष्ट झोकून देवून करा.मग त्यातून मिळणारे यश तुमच्यासाठी तरी सर्वोच्च असेल*.

Comments
Post a Comment