गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-121


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -21-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा येथील रहिमतपूर येथे झाला.एक लहान भाऊ,बहीण व तो अशी घरात तीन भावंडे. कामानिमित्त त्याचे वडील पुणे येथे येतात नरवीर तानाजी वाडीमध्ये राहून कंपनीत काम करतात.पुणे येथे त्याचे शिक्षण सुरू होते,पण दहावी नंतर तो शाळा सोडून देतो.एके दिवशी कॅलक्यूलेटर दुरुस्तीची जाहिरात पहातो.तेथे मुलाखत देतो त्याची निवड होते.काही काळ तो तेथे नोकरी करतो.आठ तास नोकरीत त्याचे मन रमत नाही.तो स्वतःचे दुकान सुरू करतो.एकदा बँकेत गेल्यावर तेथे त्याला संगणक दिसतो.त्यावेळी म्हणजे भारतात दुर्मिळ गोष्ट.हा संगणक आपल्यालाही हाताळता यावा असा तो मुलगा निश्चय करतो.पुढे संगणक दुरुस्त करताना त्याला कळते की संगणकालाही माणसासारखे आजार होतात.तो बरा करण्यासाठी त्याला काहीतरी औषध हवे.मग तो मुलगा आपल्या भावाच्या मदतीने संगणकातील माहितीवर होणारा हल्ला रोखणारे अँटी व्हायरस सॉफ्टवेअर शोधून काढतो.जे सॉफ्टवेअर जगातील अनेक देशातील संगणकात  वापरले जाते.ते जगप्रसिद्ध अँटी व्हायरस सॉफ्टवेअर म्हणजे Quick Heal (क्विक हिल).ही अदभुत कामगिरी करणारा तो मुलगा म्हणजे मराठमोळे उद्योजक कैलास काटकर*.


*जगातील ८० पेक्षा अधिक देशातील संगणकात क्विक हिल वापरले जाते.कैलास काटकर यांचे संगणक अभियंता असणारे बंधू संजय  काटकर यांनी दीड वर्ष  मेहनत घेवून हे यश भावाच्या मदतीने मिळवले.1995 मध्ये त्यांनी पाहिले क्विक हिल अँटी व्हायरस  उत्पादन बाजारात आणले पुढे व्यवसायात काही चढउतार आले पण   या अनुभवातून शिकत व्यवसायाचा विस्तार करत क्विक हिलची नाशिकला पाहिली शाखा काढली पुढे हा विस्तार जपान,अमेरिका,आफ्रिका,युएई पर्यंत जावून पोहोचला. एंटरप्राईस ग्राहक सुरक्षा सॉफ्टवेअर,एंटरप्राईस ॲडपॉइंट सुरक्षा सॉफ्टवेअर यांनी कंपनीला वेगळ्या उंचीवर पोहचवले. सर्व्हर,क्लाउड,लघु मध्यम उद्योगांना सुरक्षा सॉफ्टवेअर विकसित करणे यात कंपनी काम करते.चांद्रयान -3 मोहिमेसह भारतीय अनेक संस्थांना सायबर सुरक्षा प्रदान करणारे, संगणकांचे विषाणू शोधून त्यांचे आजार बरे करणारे कैलास काटकर व  संजय काटकर हे संगणकांचे खरेखुरे डॉक्टर आहेत*.


*कैलास काटकर यांचे स्वतःचे शिक्षण कमी असूनही भावाला संगणक अभियंता बनवून काही हजारांपासून सुरू झालेला व्यवसाय चारशे कोटीपर्यंत पोहोचवला.तेराशे कोटी पेक्षा अधिक बाजार मूल्य असणाऱ्या या कंपनीत एक हजार पेक्षा अधिक कामगार काम करतात.मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही हा समज मोडीत काढत काटकर यांनी यशाचा एक वेगळा दीपस्तंभ आपल्या समोर उभा केला.आज संगणक अँटी व्हायरस म्हटले की क्विक हिल या नावाशिवाय पुढे जातात येत नाही.काटकसर बंधूंनी हे मिळवताना कायम नाविन्याचा ध्यास घेतला म्हणून ते यशस्वी ठरले.त्यांच्या जीवनातून हाच आदर्श घ्यायचा की एखाद्या नवीन कल्पनेत यश मिळाले की त्या यशात न रमता त्या यशाचा उत्सव साजरा करून पुढे निघून जा कदाचित यापेक्षा मोठे यश तुमची वाट बघत असेल इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्यासाठी*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०