गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१२०
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -20-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याच्या जन्म गोवा राज्यातील कुडकुचे या गावी 30 नोव्हेंबर 1910 रोजी झाला.त्याचे मुळगाव होते बोरी.त्याचे प्राथमिक शिक्षण पोर्तुगीज शाळेत होते.पुढे तो मुलगा मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण होतो.नंतर कर्नाटक कॉलेज मध्ये प्रवेश घेतो पण परिस्थितीमुळे शिक्षण झेपणार नाही म्हणून कॉलेज सोडून नोकरीसाठी मुंबईला येतो.तेथे त्याचे मन रमत नाही तो परत गोव्याला येतो.तेथील इंग्रजी शाळेत शिक्षकाची नोकरी पत्करतो.त्याला असणारी कवितेची आवड,गेय स्वरूपात कविता सादर करण्याची त्याची कला याने त्याला अमाप प्रसिद्धी मिळते.पुढे त्याला अवघा महाराष्ट्र आनंदयात्री कवी म्हणून ओळखतो.तो मुलगा म्हणजे प्रसिद्ध कवी,कादंबरीकार,ललित लेखक,कथाकार,पद्मश्री बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा.भ.बोरकर*.
*बा.भ.बोरकर यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तो 'प्रतिभा'.त्यानंतर भा.रा.तांबे, वि.स.खांडेकर यांचा परिचय झाल्यावर त्यांची लेखणी बहरली.बडोद्याच्या साहित्य संमेलनातील त्यांनी गायलेल्या दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या कवितेने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. जीवन संगीत,दूधसागर,आंनदभैरवी, गितार,चैत्रपुनव,चांदणवेल,कांचन संध्या हे त्यांचे काव्य संग्रह प्रकाशित झाले.त्यांच्या कविता निसर्ग संपन्न जशा आहेत तशाच त्या कवितांमध्ये एक वेगळी अनुभूती येते.अक्षरगण वृत्ते,मात्रा,जातिवृत्ते यावर त्यांची पकड होती.त्यांच्याकडे कवितांसाठी शब्दांचे भांडार मुबलक असल्यामुळे त्यांनी अनेक वेळा श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले*.
*कवितेशिवाय कागदी होड्या, घुमटावरचे पारवे,चांदण्याचे कवडसे,मावळता चंद्र,अंधारी रात इ ललित लेखांची त्यांची पुस्तके प्रकाशित झाली.रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही त्यांनी काही पुस्तके लेखन केले.त्यांनी कोकणातही अनेक कविता लेखन केले.त्यांच्या 'सासाय'या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार ही मिळाला.बा.भ.बोरकर यांना शिक्षण मध्येच सोडवे लागले,पण असलेल्या गरिबीत त्यांनी संधी शोधली.स्वतःतील नवनिर्मितीची जाणीव त्यांना झाली,यातून ते इतके यशस्वी झाले.त्यांचा जीवन पट वाचत असताना आपल्याला हाच बोध मिळतो की, स्वतःचे असणं हे स्वतःच्या जिवावर उभे करावे लागते.कठीण परिस्थितीत शेवटपर्यंत लढत रहावे,कारण काय सांगावे प्रयत्नांच्या किल्ल्यांच्या जुडग्यातून शेवटच्या चावीने तुमच्या यशाचे कुलूप उघडेल*.

Comments
Post a Comment