गोष्टी-जिद्दी माणसांच्या भाग.११०

 




 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या*

*📝*भाग -११०-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे ता. खेड. जिल्हा पुणे*

    8308677799

    8806150248     



                   *अमेरिका देशातील न्यूयॉर्क येथील व्हाईट प्लेन्स येथे14 मे 1984 मध्ये त्याचा जन्म झाला.त्याचे वडील एडवर्ड डेंटिस्ट तर आई कॅरेन मानसोपचार तज्ज्ञ.त्याला लहानपणापासून संगणकाची प्रचंड आवड होती.त्याची आवड पाहून वडिलांनी त्याच्यासाठी संगणक शिक्षक नेमला.त्याचे काही प्रश्न संगणक शिक्षकालाही कठीण जात.संगणक प्रोग्रामिंग तो सहज बनवत असे.अगदी लहान वयात ZUCK NET मेसेंजर त्याने बनवले.पुढे तो मुला मुलींचे फोटो एकत्र करून कोणता चेहरा सुंदर आहे यासाठी FACE MASH वेबसाईट बनवतो,ती लोकप्रिय झाल्यावर आपल्या काही मित्रांना बरोबर घेऊन तो हॉवर्ड युनिव्हर्सिटी च्या हॉस्टेल च्या खोलीतून एका अद्भुत  सोशल साईडची निर्मिती करतो जी पुढे वर्षानुवर्षे न भेटलेल्या अब्जावधी लोकांना एकत्र आणते ती सोशल साईड म्हणजे Facebook.आणि ते बनवणारा तो मुलगा म्हणजे मार्क झुकरबर्ग*.   

                  जगातील सर्वात तरुण अब्जाधीस असणारे झुकरबर्ग यांना पर्सन ऑफ द इयर,जगातील 100 श्रीमंत  व्यक्तीत स्थान,जगातील शक्तिशाली लोकांत 10 वा क्रमांक,हॉवर्ड कडून मानद पदवी.यासारखे अनेक मान सन्मान मिळाले.फेसबुक साठी मध्येच शिक्षण सोडणारे मार्क हे हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या कॉलेज मध्ये शिकत असताना तेथे मुला मुलींचे  परिचय देणारे ,फोटो असणारे फेसबुक नावाचे  पुस्तक होते यावरून  त्यांना फेसबुक ची कल्पना सुचली.प्रथम ते काही कॉलेज पुरते मर्यादित होते.पण यातून अनेक लोक जोडले जावे.जुने मित्र मिळावे,वैचारिक देवाणघेवाण व्हावी म्हणून मार्क यांनी फेसबुक सार्वजनिक केले.आज दोन अब्जच्या आसपास यूजर फेसबुकचे  आहेत.     



                                   *सुरुवातीला मार्क यांचे कमी वय,तज्ञांचा अविश्वास, यामुळे प्रथम त्यांच्या फेसबुक कडे दुर्लक्ष केले गेले,पण ते खचले नाही.पुढे फेसबुक ने व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम चे  आपल्याकडे विलीनीकरण करून बाजारात तगडा प्रतिस्पर्धी निर्माण होऊ दिला नाही. करडा टी शर्ट आणि निळी ब्लु जीन्स पॅन्ट कायम परिधान करणारे अब्जाधीश मार्क म्हणतात'मी एकाच रंगाचे पोशाख कायम परिधान करतो कारण मला कपडे कोणते घालायचे हा प्रश्न पडत नाही आणि काम करताना तितका वेळही नाही'.त्यांनी आपल्या मुलीच्या जन्मावेळी साडेचार हजार कोटी डॉलर सामाजिक कार्यसाठी दान केले आहे.फेसबुक चे मुख्यकार्यकारी अधिकारी असणारे मार्क व्यवसायाचे सोपे गणित सांगतात ते असे कोणताही धोका न घेणे हा  सर्वात मोठा धोका आहे.खरोखर वेगाने बदलत असलेल्या या जगात अपयशी ठरण्याची एकमेव रणनीती म्हणजे धोका न घेणे.मार्क यांच्या आयुष्याकडे पहाताना लहान वयातही तुमची वेगळी कल्पना तुम्हाला खुप मोठे करते आणि अविस्मरणीय यश मिळवून देते हाच धडा मिळतो*.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०