गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२७

*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 
*📝भाग -27-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249

*त्यांच्या जन्म महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ला येथे 10मार्च 1929 रोजी आई रखमाबाई व वडील केशव यांच्या पोटी झाला.तो लहान असताना त्याची आई त्याला केशवसुत,बालकवी,गोविंदाग्रज यांच्या कविता वाचून दाखवत,त्यामुळे त्याची कवितांची आवड वाढत गेली.काही काळानंतर तो मुलगा मायानगरी मुंबईला येतो.येथेच त्याचे माध्यमिक शिक्षण होते.पुढे तो मुलगा मुंबई विद्यापीठातून सुवर्णपदकासह मराठी व संस्कृतची पदवी मिळवतो.शिक्षक म्हणून नोकरी करताना तो प्रसिद्ध अशा साधना साप्ताहिकात संचालक म्हणून काम करतो.तो मुलगा आपल्या सिद्धहस्त लेखणीतून इतक्या सुंदर कविता लिहितो की साऱ्या महाराष्ट्रावर आपल्या कवितांचे गारूड करतो.तो मुलगा म्हणजे महान कवी महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगांवकर*.

*मंगेश पाडगांवकर यांनी मराठी साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण,महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव,जनस्थान,लता मंगेशकर, महाराष्ट्र साहित्य परिषद कडून म.सा.प यासारखे असंख्य पुरस्कार मिळाले. विश्व साहित्य संमेलनाचे,बालकुमार साहित्य संमेलनाचे व कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला.त्यांनी वसंत बापट व विंदा करंदीकर यांच्या बरोबर कवितांचे कार्यक्रम करताना अख्खा महाराष्ट्र पालथा घातला.धारानृत्य हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह.जिप्सी, छोरी,विदूषक,सलाम,गझल, बोलगाणी हे त्यांचे इतर काव्यसंग्रह.त्यांच्या सलाम या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला.शुक्रतारा मंद वारा,दिवस तुझे हे फुलायचे,या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे,भातुकलीच्या खेळामध्ये,असा बेभान हा वारा,भेट तुझी माझी स्मरते,चांदोमामा,भोलानाथ, वेड कोकरू,त्यांची ही गाणी अजरामर झाली.तुलशीदास व मिरा यांच्या कवितांचे भावपूर्ण अनुवादही त्यांनी केले*.

*प्रेम म्हणजे प्रेम असते,अशी पाखरे येती आणिक,सांगा कस जगायचं त्यांच्या या कवितांनी रसिकांना भुरळ घातली.नाट्यकविता,बालकविता,गझल अशा सर्व कवितेच्या दुनियेत ते लिलया संचार करून येत असे.त्यांच्या कवितांवर लहान थोर आजही फेर धरून नाचतात हेच त्यांच्या कवितांचे यश.इतक्या विविध विषयावर दर्जेदार साहित्य निर्मिती करणारे मंगेश पाडगांवकर यांची प्रतिभा अचाट होती.लहानात लहान होऊन कविता करताना त्यांच्या कवितांतून जणू जीवन संगीताचा वर्षावच होतो आहे असे काही क्षण वाटून जाते.जीवनावर शतदा प्रेम करायला शिकवणारे आनंदयात्री कवी मंगेश पाडगांवकर आपल्याला जणू हेच सांगतात की आलेल्या जन्मात थोडेच काम करा पण अस्सल करा.जे कायमचे समाज मनावर खोलवर परिणाम करेल आणि इतिहासाच्या पानावर कोरले जाईल*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०