गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग -१२४


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*

 *नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -24-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म रशियातील मॉस्को शहराजवळील कलुशिनो या लहानशा गावी 9 मार्च 1934 रोजी झाला.त्याचे वडील सुतार काम करायचे.कुटुंबात कुणीही उच्च शिक्षित नव्हते.चार भावंडांमध्ये तो तिसरे अपत्य होता.त्याची बुद्धी लहानपणापासून तल्लख होती.दुसऱ्या महायुध्दात त्याच्या कुटुंबाचे प्रचंड हाल होते.पुढे काही दिवसांनी स्थैर्य आल्यावर भावंडांचे शिक्षण सुरू होते.त्याची हुशारी त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आली होती.त्याचे शिक्षक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी रेड आर्मी एअरफोर्स मध्ये प्रवेश घेतात.त्याला एअरफोर्स बद्दल आकर्षण निर्माण होते.पुढे त्याचे ध्येय ठरते की आपणही याच क्षेत्रात मोठे व्हायचे. मग तो मुलगा आपल्या बुद्धीच्या व मेहनतीच्या बळावर या क्षेत्रात इतकी मेहनत घेतो की जगातील पहिला अंतराळवीर म्हणून त्याला मान्यता मिळते.हे यश मिळवणारा तो मुलगा म्हणजे महान अंतराळवीर युरी गागारीन*.


*गागारीन यांची टेक्निकल स्कूल मध्ये ट्रेनिंग साठी निवड झाल्यावर ते एअरो क्लबचे सदस्य बनतात.पुढे ते लहान एअरो क्राफ्टच्या उड्डानाचे प्रशिक्षण घेतात.टेक्निकल शिक्षण पूर्ण झाल्यावर पायलट ची परीक्षा उत्तीर्ण होवून ते पोस्ट  ग्रॅज्युएशन करून पदविका मिळवतो.आता त्यांना वेगवेगळया वाटा खुणावत असतात.1960 मध्ये 20 अंतराळवीरांपैकी युरी यांची एकट्याची सोव्हिएत अंतराळ कार्यक्रम निवड होते.आकाशातील ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 12 एप्रिल1961 रोजी अंतराळयानातून अंतराळात प्रवेश करून त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली.पृथ्वीभोवती फेरी घालणारे पहिले व्यक्ती युरी गागारीन हे नाव इतिहासात अमर झाले*.


*साहस,चिकाटी,कर्तव्यदक्षता,आणि विशेष म्हणजे अंतराळयान येथील वातावरण हाताळण्याची त्यांची अद्वितीय क्षमता या गुणांमुळे युरी यांना या आगळ्यावेगळ्या व जगाला त्यावेळी नवीन असणाऱ्या क्षेत्रात यश मिळाले.त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून रशिया सरकारने त्यांना सोव्हिएत वीर म्हणून किताब दिला.उनेपुरे फक्त 34 वर्षाचे वर्षाचे आयुष्य युरी गागारीन यांना लाभले. त्याचा शेवटही अंतराळ कार्यक्रमात व्यस्त असतानाच झाला.त्याचे आयुष्य आपल्याला हेच जाणीव करून देते की मिळालेल्या थोड्या आयुष्यातही समाज मनावर आपल्या  दैदिप्यमान कार्याने न पुसणारा ठसा आपल्याला ठेवून जाता येतो.असे कार्य जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा अनेक पिढ्यांना लढण्याची प्रेरणा नक्की देते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०