गोष्टी जिद्दी माणसांच्या -भाग116

 


*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या*


*पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -16-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*तिचा जन्म मुंबई मध्ये 15 मे 1967 रोजी आई स्नेहलता व आई शंकर यांच्या पोटी झाला.तिचे सुरुवातीचे शिकण डिव्हाईन चाईल्ड हायस्कूल मध्ये झाले  शालेय शिक्षणानंतर ती पार्ला कॉलेज मध्ये प्रवेश घेते.ती तेथे मायक्रोबायोलॉजी करण्याच्या उद्देशाने सूक्ष्मजीवशास्त्र विषय घेवून अभ्यास करते.याच दरम्यान भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात अभ्यास करून ती त्याच तजबेज होते.तिला उपजत असणारी अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नाही.पुढे ती मुलगी पुढे आपल्या सौंदर्याने आणि कसदार अभिनयाने बराच काही चित्रपट सृष्टीवर वर्चस्व गाजवते.तिच्या अनेक चित्रपटांचे चित्रपट गृहात हाऊस फुल चे बोर्ड लागतात.ती म्हणजे चित्रपटाला हमखास यश हे जणू समीकरण बनते.निर्मात्यांची तिच्याकडे चित्रपट बनवण्यासाठी रांग लागते.हे सर्व आपल्या अभिनयाच्या जोरावर घडवून आणणारी ती अभिनेत्री म्हणजे माधुरी दिक्षित-नेने*


*एखादे व्यक्तिमत्व इतके मोहक आणि कलात्मक असते की सारे जग त्याच्याकडे  आकर्षित होते.अशीच मोहिनी माधुरीने आपल्या अवखळपरिपूर्ण अभिनयाने समाज मनावर घातली.तिच्या अभिनयाचा गौरव म्हणून तिला पद्मश्री,फिल्म फेअर ,स्टार स्क्रीन, झी सिने,उत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड यासारखे अनेक पुरस्कार मिळाले.अबोध या 1984 साली  पहिल्या चित्रपटापासून सुरू झालेला प्रवास तेजाब,दयावान,राम लखन, दिल,साजन,बेटा,खलनायक, यासारख्या प्रचंड गाजलेल्या चित्रपटापर्यंत आला. हम आपके है कौन,दिलं तो पागल है या चित्रपटांनी  अनेक उच्चांक मोडीत काढले.देवदास चित्रपटात तिच्या नृत्य अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली*.


*माधुरीच्या अभिनयातील परिपक्वता,भूमिकेची समज,यामुळे तिची गणना श्रेष्ठ अभिनेत्रीत केली जाते.एखादे पात्र उभे करायला भूमिकेतील बारकावे ओळखून ती उत्तम प्रकारे सादर करण्याची एक वेगळी कला माधुरीकडे होती.तिच्या अभिनयातील जिवंतपणा आणि तिचा बोलका चेहरा तिच्या लोकप्रियतेचे यश होते.कलावंत म्हणून माधुरी तिच्या अभिनयाच्या प्रांतात प्रचंड यशस्वी झाली.तिचे जीवन आपल्याला हाच आदर्श घालून देते की आपली आवड वेळीच ओळखा,त्या आवडीला तुमचे स्वप्न बनवा,ते स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून अगणित मेहनत घ्या.मग त्यातून मिळणारे यश हिऱ्यासारखे मौल्यवान असते  ज्याचे मूल्य कधीही संपत नाही*.

Comments