गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ११५

 

*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -15-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म 3 जानेवारी1874 रोजी ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायर येथे झाला.त्याच्या वडिलांकडून संसदीय कारकीर्दीचा वारसा त्याने पुढे चालवला.1900पासून1955पर्यंत इतक्या दीर्घकाळ तो संसदेचा सभासद राहतो.व्यापारमंत्री,आरमार मंत्री,युद्धमंत्री शेवटी देशाचा पंतप्रधान अशी पदे तो भूषावतो.तो  मुलगा म्हणजे एक ब्रिटिश झुंजार नेता,सर्वाधिक काळ मंत्रीपदावर असलेला राजकारणी,नोबेल परितोषिक मिळवणारा साहित्यिक, विन्स्टन चर्चिल*.


*लोकशाही आणि साम्राज्यवाद यांचे सरमिसळ धोरण अवलंबणारे अनेक पैलू असणारे व्यक्तीमहत्व म्हणजे विन्स्टन चर्चिल.पहिल्या महायुध्दात  त्यांनी लढाई थोपवून धरली ते त्यांचे मोठे योगदान तर दुसऱ्या महायुद्धात विजय यातून त्यांचे कर्तृत्व अजून उजळून निघाले.यावेळी ब्रिटिश जनतेने  कणखर नेता म्हणून त्यांचे नेतृत्व मान्य केले.ते आपल्या भाषणाने ब्रिटिश जनतेची मन जिंकत असे.ते जनतेला म्हणत असे रक्त,अश्रू,श्रम,घाम,याशिवाय तुम्हाला द्यायला माझ्याकडे  काहीही नाही. खाण कामगारांची सुरक्षा, निवृत्त सैनिकांची सोय,सुसज्ज आरमार,त्याला वायुदल नौदलाची जोड ही त्यांनी प्रभावी कामे केली*.


*आजूबाजूला महायुद्धाचे वातावरण,देशाचे पंतप्रधान असतानाही एक दर्जेदार लेखक म्हणून चर्चिल यांचे लिखाण सुरू होते.स्टोरी ऑफ मालकंद ,फोल्ड फोर्स,द वर्ल्ड क्रायसिस यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले.द सेकंड वर्ल्ड वॉर या त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर लिहिलेल्या वर्णनात्मक ग्रंथाला नोबेल पारितोषिक मिळाले.सहाव्या जॉर्ज राजाने देऊ केलेले उमरावपद नाकारून त्यांनी लोकप्रतिनिधीच राहणे पसंद केले.चर्चिल यांचे जीवन आपल्याला हाच संदेश देते की हार मानू नका,तुमचा शत्रू  तुम्हाला वाटतो तितका कदाचित बलशाली नसतो त्यामुळे कधीही हर मानू नका*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०