गोष्टी जिद्दी माणसांच्या -भाग 113
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -13-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याच्या जन्म पोलंड मध्ये 19 फेब्रुवारी 1473 मध्ये झाला.त्याचे वडील निकोलस हे व्यापारी तर आई बार्बरा व्यापाऱ्याच्या घरातील मुलगी.लहानपणी त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो त्याच्यावर, आईवर दुःखाचा डोंगर कोसळतो.यावेळी त्याचे मामा व चुलते त्याच्या पाठीमागे भक्कम उभे राहतात.पुढे तो मुलगा क्राको विद्यापीठातून खगोलशास्त्र,ज्योतिषशास्त्र,वैद्यकशास्त्र,कॅनन विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवतो.खगोलशास्त्र या विषयात आपल्या ज्ञानाचा उपयोग करून पृथ्वीभोवती नाही तर सूर्याभोवती ग्रह फिरतात हा सिद्धांत मांडतो.हा क्रांतिकारी शोध लावणारा तो मुलगा म्हणजे निकोलस कोपर्निकस*.
*याआधी पृथ्वी हा विश्वाचा केंद्र बिंदू असून सूर्य हा पृथ्वी भोवती फिरतो या रूढ समजुतीला छेद देत सूर्य हा ग्रहमालेचा केंद्र बिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात हा सिद्धांत कोपर्निकस यालाच कोपर्निकस क्रांती म्हणतात.विश्वाच्या केंद्राजवळ सूर्य विश्रांती घेतो आणि पृथ्वी आपल्या अक्षावर दररोज एक फेरी पूर्ण करते. सूर्याभोवती ती वर्षभर फिरले यालाच कोपर्निकसची सूर्य केंद्रित प्रणाली म्हणतात.पुढे गॅलिलिओ गॅलिनी, केपलर,आयझॅक न्यूटन यांच्या शोधांच्या संशोधनाच्या संयोजनातून कोपर्निकसचा सुर्यकेंद्री सिद्धांत अचूक होता हे पुढे सिद्ध झाले*.
*ऋतू,दररोज सूर्याचा उदय आणि अस्त,ग्रहांची हालचाल या सर्व गोष्टी पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे होतात हा कोपर्निकस यांचा शोध त्या काळातील धार्मिक कट्टरता बनलेल्या समाजाच्या अनेक समजुतींना आव्हान होते.कॅथोलिक चर्चचा याला खूप विरोध झाला.कोपर्निकस यांनी लोकांना विश्र्वाकडे एका नवीन दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पाडले.आपण स्वतः विश्वाचा एक भाग आहोत आपल्या नंतर ही या विश्वाचे अस्तित्व असणार आहे हा आरसा त्यांनी समाजाला दाखवला.चर्चेचे गाळा भाडे गोळा करणे,बेकरी मध्ये गिरणी व्यवस्थापन करणे यासारखी कामेही कोपर्निकस यांनी केली.उत्तम खगोलशास्त्रज्ञ,गणिततज्ञ असणारे कोपर्निकस यांचे जीवन आपल्याला हाच संदेश देते की कायम नाविन्याचा शोध घ्या.स्वतःतील जे उत्तम आहे ते कायम शोधा.मग तुमच्या हातून होणारे काम जगावेगळे असते*.

Comments
Post a Comment