गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग-१११
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -11-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*त्याचा जन्म रशिया मधील लेनिग्राड शहरात 10ऑक्टोंबर 1984 मध्ये झाला.वडील व्हेलेरी भाषाशास्त्राचे प्राध्यापकहोते.त्याचा आईचे नाव अल्बीना.लहानपणीचे शिक्षण पूर्ण करून तो पीटर्स बर्गच्या विद्यापीठात प्रवेश घेतो.तेथे तो 2006साली मित्रांच्या मदतीने vk नावाचे मेसेंजर ॲप बनवतो.पुढे ते ॲप लोकप्रिय झाल्यावर इतर मेसेंजर ॲपला बाजारात प्रतिस्पर्धी ॲप बनवण्याची कल्पना त्याच्या मनात येते.मग तो मुलगा झपाटून काम करतो एंड टू एंड सुरक्षित असे ॲप बनवतो.पुढे ते ॲप इतके लोकप्रिय होते की त्याचे नऊशे दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते होतात.ते लोकप्रिय ॲप म्हणजे टेलिग्राम आणि ते ॲप बनवणारा तो मुलगा म्हणजे पॅव्हेल डूरोव*.
*पॅव्हेल यांना रशिया देशाचे मार्क झुकेनबर्ग म्हटले जाते.टेलिग्रमाचे मुख्यालय दुबई येथे आहे तर आशिया,आफ्रिका,युरोप येथे या ॲप चे सर्वात जास्त वापरकर्ते आहेत.मेसेज,ॲडिओ कॉलिंग यासाठी सर्वात सुरक्षित हे ॲप मानले जाते.रशियन युक्रेन युध्दात या ॲप चा सर्वाधिक वापर यासाठी झाला असे म्हटले जाते.पीटर्सबर्गच्या खिडकीतून कागदी नोटांची विमाने करून काही चाहत्यांनी फेकली त्यावरून पॅव्हेल यांनी टेलिग्रामचा लोगो कागदी विमान ठरवला.काही कारणाने रशिया देश सोडल्यावर पॅव्हेल यांनी दुबईला आपल्या व्यवसायाचे केंद्र बनवले.अरबी व्यवसायाने दुबईतील सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक ते मानले जातात.15 अब्ज पेक्षा अधिक संपत्ती असणारे पॅव्हेल हे आपल्या वाढदिवसाला करोडो रुपये दान करतात*.
*पॅव्हेल यांनी सामाजिक कार्याबरोबर अनेक माता पित्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.ते स्वतः अविवाहित असूनही 100 हून अधिक जैविक मुलांचे 12 देशात बाप आहेत आणि याचा त्यांना अभिमान आहे. उदारमतवादी,पूर्णपणे शाकाहारी असणारे पॅव्हेल हे भाषा विज्ञानाची पदवी घेवून बाहेर पडले.इतरांपेक्षा चाकोरी सोडून जगावेगळा विचार केला म्हणून टेलिग्रामची निर्मिती झाली.पॅव्हेल यांनी आपल्या आयुष्याची वेगळी वाट निवडली ती आपल्याला किती यश देणार आहे हे त्यांना कदाचित माहित नसेल,पण आपण निवडलेली वाट बरोबर आहे हे त्यांना पक्के माहीत होते.त्यावरून ते गेले आणि प्रचंड यशस्वी झाले त्यांच्या जीवनातून आपण हेच शिकायचे कि तुम्ही प्रवाहाच्या वेगळे काम करा त्यात शेवट पर्यंत जाण्यास तुम्ही यशस्वी झालात तुम्ही यशाच्या शिखरावर असता*.

Comments
Post a Comment