गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १२६
*📝गोष्टी जिद्दी माणसांच्या** *पर्व -2*
*नवीन गोष्टी नवीन व्यक्ती*
*📝भाग -26-*
*📝*श्री.चंद्रकांत मारुती बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*
8308677799
8806150249
*मध्यप्रदेश राज्यातील बारावणी येथे त्याचा जन्म 11 नोव्हेंबर 1943 मध्ये झाला.त्याचे वडिल पुरुषोत्तम व आई कमला हे गांधीवादी विचाराने भारलेले होते.स्थानिक शाळेत त्याचे सुरुवातीचे शिक्षण होते.मॅट्रिक चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो मुंबईला येतो.तेथे तो मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतो तर नॉटिंगहॅम विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतो.मग तो मुलगा भाभा अणुसंशोधन केंद्रात रुजू होतो.तेथे तो आपल्या शीघ्र बुद्धिमत्तेच्या जोरावर थेरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा जनक बनतो आणि अवघ्या जगाला भारत देशाची दखल घ्यायला भाग पाडतो.हे आगळेवेगळे काम करणारा तो मुलगा म्हणजे भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक महान अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल पुरोषत्तम काकोडकर*.
*डॉ.काकोडकर यांना त्यांच्या अणुसंशोधनातील कार्याबद्दल पद्मश्री,पद्मविभूषण,महाराष्ट्र भूषण,मध्यप्रदेश गौरव,गोवा राज्याचा गोमांत भूषण,रॉकवेल पदक,फिक्की पुरस्कार,गोदावरी गौरव पुरस्कार यासारखे अनेक मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.1974 व 1998 च्या अणुचाचणीच्या व भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमुचे नेतृत्व त्यांनी केले आहे.कल्पकम आणि रावतभट्ट या मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्याचे अशक्य असणारे पुनरुज्जीवन त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या अचाट अशा तांत्रिक कौशल्याने करून दाखवले.त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी विभागात बनणाऱ्या ध्रुव रिॲक्टर मध्ये पुर्णता नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर घातली*.
*डॉ.होमी भाभा या व्यक्तिमत्वाला डॉ .काकोडकर यांच्या जीवनात अजरामर स्थान आहे.सुर्यकोटी समप्रभ दृष्टाअनुयायी,अणु विश्वातील ध्रुव डॉ.अनिल काकोडकर ही डॉक्टरांवर इतरांनी पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी स्वतः लिहून प्रसिद्ध केलेले 250 पेक्षा अधिक शास्त्रीय संशोधन लेख त्यांच्या कार्याची महती अधोरेखीत करतात.प्रत्येक काम जबाबदारीने करणारे,अडचणीत स्वतःचा मार्ग स्वतः शोधणारे डॉक्टर भारताचे सुप्रसिद्ध अणुऊर्जा शास्त्रज्ञ झाले ते त्यांच्या अफाट कष्टाच्या जोरावर.त्यांच्या जीवनातून आपल्याला हेच शिकायला मिळते की नुसती मोठी स्वप्ने पाहून ती साकार होत नाही तर त्या स्वप्नांच्या पलीकडले जावून तुमच्यातील ठिणगीचे रूपांतर पराक्रमाच्या ज्योतीत करावे लागते मगच यशाचा मार्ग खुला होतो*.

Comments
Post a Comment