गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०७


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या पर्व -2 नवीन गोष्टी नवीन व्यक्ती* 

*📝भाग -7-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म केरळ राज्यात एका  ख्रिश्चन कुटुंबात झाला.घरात दहा भावंडे.कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालत असे.कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा म्हणून तो काही दिवस फुगे विकायचेही काम करतो.हे करत असताना काही परदेशी रबर कंपन्या टायर रिट्रेडिंग प्लांटला ट्रेड रबर पुरवत आहे हे त्यांच्या नजरेतून सुटत नाही.मग अशी ट्रेड कंपनी आपल्या देशातच आपण सुरू करायची असे तो ठरवतो.तो त्याचे हे स्वप्न सत्यातही आणतो.पुढे ती कंपनी जगातील  इतकी मोठी कंपनी होते की तिचे मार्केट कॅप 46 हजार कोटींपेक्षा जास्त तर कंपनीचा व्यवसाय 65 पेक्षा जास्त देशात पोहचतो.ती प्रसिद्ध कंपनी म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच MRF. आणि ती कंपनी सुरू करणारा तो मुलगा म्हणजे MRF कंपनीचे मालक के.एम.मॅमेन मॅप्पिलाई*.


*त्या काळातील आघाडीच्या डनलॉप, फायर स्टोन,गुडइयर या कंपन्याशी स्पर्धा करताना MRF कंपनीने उच्च दर्जाचे उत्पादन करून चारच वर्षात मार्केट मधील 50 टक्के हिस्सा काबीज केला.MRF उत्पादनांची इतकी धास्ती परदेशी उत्पादकांनी घेतली की त्यांना लवकरच आपला गाशा गुंडाळावा लागला.भारतीय रस्त्याला साजेशा पहिला MRF टायर 1961 साली रस्त्यावर धावला.1964 साली टायर उचलणारा मसल मॅन चा लोगो आला आणि MRF म्हणजे बलाढ्य टायर ही कल्पना अधिक भक्कम झाली.USA  मध्ये टायर निर्यात करणारी MRF पाहिली कंपनी होती*.


*आज बाजारात MRF च्या एका शेअरची किंमत एक लाखाच्या पुढे आहे.यावरून या कंपनीचा दर्जा समजतो.भारतील सर्वात मोठी टायर,रबरी खेळणी,बेल्टस बनवणारी  कंपनी आज एक अब्ज डॉलरचा  व्यवसाय करण्या इतकी मोठी झाली यामागे के.एम.मॅमेन मॅप्पिलाई यांची जिद्द,कामाप्रती निष्ठा,नाविन्याची ओढ दिसून येते.वाहने,विमाने,सुखोई विमाने यांचे टायर बनवताना कंपनी उत्पादन आणि मार्केटिंग मध्ये कायम अव्वल राहिली आहे.के.एम.मॅमेन मॅप्पिलाई यांनी आपल्या जीवनातून आपण हेच शिकायचे तुम्ही पूर्वी काय करत होता,कोणत्या परिस्थितीत जगत होता यावरून तुमचे भविष्य ठरत नाही तर ती परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही वर्तमानात किती कठोर परिश्रम करता यावर तुमचे भविष्य ठरते*.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०