गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १०५


 *📝गोष्टी जिद्दी माणसांच्या* 

*📝भाग -5-*

*📝*श्री.चंद्रकांत मारुती     बोऱ्हाडे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहिरे*

8308677799

8806150249


*त्याचा जन्म नाशिक जिल्ह्यातील कौळाने येथे 10 मार्च1863रोजी झाला.अतिशय गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला.पण लहानपणी तो अतिशय हुशार आणि चुणचुणीत मुलगा होता.बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांचा मृत्यू होतो.यानंतर बडोद्याच्या गादीवर कुणाला बसवायचे याचा शोध सुरू होतो.एका दत्तक मुलाचा शोध सुरू होतो दत्तक म्हणून हा मुलगा बडोद्याच्या गादीवर जातो नुसताच जात नाही तर दत्तक घेतल्यावर योग्य वयात सिंहासनावर महाराज म्हणून आरूढ होतो.एक आदर्श नेटका राज्यकारभार करतो. आदर्श राजा म्हणून समाज मनात कायमचे घर करून जातो.प्रजाहितदक्ष राजा बनतो.तो मुलगा म्हणजे  पूर्वश्रमीचे गोपाळ काशिनाथ गायकवाड म्हणजेच महाराज सयाजीराव गायकवाड*.


*बडोद्याच्या राजगादीवर बसल्यावर महाराजांनी स्त्रियांना त्यांचे हक्क मिळावे म्हणून पुढाकार घेवून बालविवाह बंदी,विधवा विवाह, स्त्रियांना वारसहक्क मिळवून देणे,कन्या विक्रियबंदी,पडदा पद्धती बंद इ सुधारणा आपल्या संस्थानात  करून स्त्रियांना आधुनिक युगाचे दालन खुले करून दिले.अत्यंत पुरोगामी विचारांच्या असणाऱ्या महाराजांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले.त्यांनी आपल्या छोट्याश्या संस्थानात अनेक सुधारणा घडवून आणल्या. न्यायव्यवस्था,ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन,गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, कला शिक्षणाची सोय, अस्पृश्यता निवारण,शेतीसाठी विहिरी खोदणे,पाण्याची सोय करणे अशा आता सुरू असणाऱ्या सर्वसामान्य माणसांसाठी कितीतरी सुधारणा त्या काळी केल्या होत्या*.


*संपूर्ण देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे बडोदा संस्थान देशातील पहिले संस्थान होते.गावोगावी फिरती ग्रंथालये,ग्रामग्रंथालये सुरू करणाऱ्या महाराजांनी घटस्फोटासंबंधी पहिला कायदा केला.टिळक,बाबू अरविंद घोष यांच्याशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या महाराजांचा राष्ट्रीय आंदोलनाला पाठिंबा होता.वस्तुसंग्रालय,रुग्णालय, महाविद्यालये,नजरबाग,लक्ष्मीविलास राजवाडा या सर्वांमुळे बडोदा  प्रेक्षणीय नगरी ठरली.भारतातच नाही तर जगातील अनेक गरजवंताला मदत करणारे सयाजीराव आयुष्यभर  प्रजाहिताच्या सुधारणासाठी झटले. त्यांचे जीवन आपल्याला हाच आदर्श देते की समाजाचा नेता हा मेंढपाळा सारखा असावा कितीही त्रास झाला,अडचणी आल्या त्या सोडवत सर्व लोकांना बरोबर घेवून जाण्याची क्षमता, त्याच्याकडे असावी.तेव्हाच समाज मनात त्याचे नाव मृत्यूनंतरही कायमचे कोरले जाते.*

Comments

Popular posts from this blog

राज्यातील स्वच्छ सुंदर शाळा धानोरे ,

गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग १३४

गोष्ट माझ्या आईची भाग-२०