Posts

Showing posts with the label गोष्टी जिद्दी माणसांच्या भाग ४

गोष्टी- जिद्दी माणसांच्या भाग ४

Image
 *📝*गोष्टी-जिद्दी माणसांच्या* *📝*भाग-4* *📝श्री.चंद्रकांत बोऱ्हाडे*       8308677799       8806150248 *मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड हे त्याचे गाव .वयाच्या पाचव्या वर्षी त्याची आई त्याला  कायमची सोडून जाते.पहिलवान असणाऱ्या वडिलांना आपल्या मुलानेही पहिलवान होऊन कुस्तीला वैभव मिळवून द्यावे असे वाटत होते. मोठा झाल्यावर वडिलांच्या स्वप्नांसाठी तो मल्ल विद्देच्या खडतर तपश्चर्येसाठी कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत दाखल होतो .तेथे  त्याचे  गुरू  होते पै.गणपत खेडकर  .प्रचंड मेहनत,शांत स्वभाव,जबरदस्त आत्मविश्वास हे कुस्तीचे सारे गुण त्याच्या अंगी जन्मजातच  टिच्चून भरले होते.दिल्लीचा मल्ल सतपालने महाराष्ट्राचा मल्ल दादू चौगुलेला  पराभूत करून फरपटत मैदानात मध्यभागी आणून जो विजयाचा उन्माद दाखवला होता .तो लोकांना अजिबात आवडला नव्हता. कुस्तीशौकिंनासाठी असणारी ही भळभळती जखम कुणीतरी पुसायला हवी असे सर्वांना वाटत होते. पण सतपालशी मुकाबला करायला कुणी तयार नव्हते .कारण दुहेरी पट व बकरी पछाड हे त्याचे दो...